June 30, 2025 4:40 am

लहान मासे व मांगूर मासा अवैध्य रित्या होतं असलेली मासेमारी तात्काळ बंद करण्यासाठी अडतदार व व्यापारी यांचे व्यवस्थापनास निवेदन

अपनी भाषा में पढ़े! Translate

लहान मासे व मांगूर मासा अवैध्य रित्या होतं असलेली मासेमारी तात्काळ बंद करण्यासाठी अडतदार व व्यापारी यांचे व्यवस्थापनास निवेदन

(निलेश गायकवाड)

अवैधरीत्या लहान मासे ( भुंगा ) व मांगुर मासा खरेदी करत असल्याबाबत अडतदार व व्यापारी वर्ग यांच्या वतीने उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर यांना लेखी निवेदनाद्वारे कारवाईची केली मागणी.

सविस्तर माहिती अशी ..

कृषी उत्पन्न उप बाजार समिती भिगवन या हद्दीमध्ये मच्छी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री व्यवसाय केला जातो. काही दिवसांपूर्वी पाटबंधारे विभागाच्या मार्फत छोटे मासे पकडण्यास व खरेदी विक्री व्यवसाय करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्यामार्फत मत्स्य बीच उजनी जलाशय सोडण्यात आले आहे आहेत. परंतु या मासेमारीमुळे सोडलेले मत्स्य बीच हे खूप मोठ्या प्रमाणात मारले जात असल्याचे अडतदार व व्यापारि वर्गाचे म्हणणे आहे. तसेच काही मच्छिमार व व्यापारी राजरोसपणे रात्रीच्या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात खरेदी-विक्री व्यवसाय करत आहेत. यामुळे ही खरेदी विक्री अशी चालू राहिली तर कालांतराने छोटे मासे कमी होईल माशांचे उत्पन्न घटेल व मासेमारी व खरेदी विक्री व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता होईल. तसेच यामुळे या व्यवसायावर भिगवण परिसरातील लहान मोठे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू असतो यामुळे त्यांचा भविष्यातील धोका निश्चित दिसल्यामुळे सदर होत असलेल्या अवैधरित्या मासेमारी वरती उजनी धरण व्यवस्थापन विभागाने कायदेशीर कारवाई करून तात्काळ बंद करावे असे लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!