बोरी नदी पात्रात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी राबविले स्वछता अभियान..
अमळनेर : विक्की जाधव.
श्री संत सद्गुरु सखाराम विठ्ठल रुक्माई संस्थान अमळनेर व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने यात्रोत्सवानिमित्त बोरी नदी पात्रात प्लास्टिक मुक्त मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेस उस्फूर्त प्रतिसाद दोन घंटा गाड्या भरून प्लास्टिक जमा करण्यात आले या उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना संचालक सचिनजी नांद्रे, प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील,प्राचार्य ए. बी. जैन, माजी प्राचार्य डी. एस. भावसार, तसेच आधीसभा सदस्य डॉ. धीरज वैष्णव, प्रा.अमृत अग्रवाल,प्रा, धनंजय चौधरी, महेश माळी, डॉ.हेमंत पाटील डॉ. राजपूत डॉ.एस. बी. शिंगाणे डॉ.पवन पाटील डॉ. दिलीप गिऱ्हे, महीला योगा ग्रुप अमळनेरच्या, सुनीता मनीष करंजे, शिला पाटील, पद्मजा पाटील, मीना अग्रवाल, सुरेखा खैरनार, गंगा अग्रवाल, अंजू ढवळे, दिपाताई पाटील, उर्मिला अग्रवाल, सोनल गोसलिया यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. आपण या प्लास्टिकपासून आपल्या नदीचा नाल्यांचा जर संरक्षण केले नाही तर येणाऱ्या काळामध्ये याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. त्यामुळे प्लास्टिकचा उपयोग करीत असताना प्लास्टिक हे कुठेही न फेकता त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे असे विचार संचालक नांद्रे यांनी व्यक्त केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथर्व करंजे, रेणुका करंजे, प्रा. डॉ. मनीष रघुनाथ करंजे यांनी सहकार्य केले.