November 24, 2024 5:28 pm

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अचानक जिल्ह्यातील राजकारणात करण पवार नाव चर्चेत. भारतीय जनता पक्षाला आव्हान..

अपनी भाषा में पढ़े! Translate

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अचानक जिल्ह्यातील राजकारणात करण पवार नाव चर्चेत. भारतीय जनता पक्षाला आव्हान..

अमळनेर : विक्की जाधव..

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अचानक जिल्ह्यातील राजकारणात करण पवार नाव चर्चेत आले आहे. भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाचे सक्षम कृतिशील आणि तरुण तडफदार उमेदवार करण पवार यांना जनसामान्यांची चांगलीच पसंती. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे स्मिताताई वाघ यांना अमळनेर तालुक्यातील स्थानिक अंतर्गत गटबाजीचे राजकारण पडणार महागात..

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या काही नेत्यांच्या सभा झाल्या तर भाजपाच्याच काही नेत्यांनी जळगाव जिल्ह्या लोकसभा मतदारसंघकडे पाठ फिरवली, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाचोरा, शिरपूर, नंदुरबार. जिल्ह्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचार सभा घेतल्या पण जळगाव जिल्ह्याकडे मुख्य:त पारोळा, अमळनेर, कडे फिरवली पाठ तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा देखील ऐनवेळी रद्द झाल्याने अंतर्गत भाजपाच्या सर्वेने आणि तज्ञांच्या मते जळगाव जिल्हा लोकसभा मतदारसंघात मोठी खेळी खेळली जात आहे. असे कळुन चुकले आहे का??

 

अमळनेर चे माजी आमदार आणि वरिष्ठ नेते अमळनेरकर म्हणून जपणार का स्मिता ताईंची अस्मिता..

स्मिताताई वाघ यांना उमेदवारी देऊन भाजपाच्या मोठ्या नेत्यांनी जळगाव जिल्ह्याकडे पाठ फिरवली आणि सभा ही टाळल्या असून जळगाव लोकसभेची जागा डेंजर झोन मध्ये असून बड्या नेत्यांनी पाठ फिरवली. असे तज्ञांचे मत आहे तर होऊ घातलेल्या लोकसभेच्या रणांगणात करण पवार हे भाजपाला जड जाणार.

पारोळा विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून करण पवार (पाटील) परिवराच्या ताब्यात आहे या मतदारसंघात त्यांनी जो विकास साधलां त्यांची विरोधकांना धडकी भरली आहे.

तर अमळनेरच्या राजकारणात दोघात घोडं मारलं तिसरायचं अशी गत झाली आहे. नुकतीच झालेल्या भाजपाच्या बाईक रॅलीत दोघे तिघे माजी आमदारांनी दांडी मारली. आता पुढच्या दोन दिवसात हेच आमदार भाकरी फिरवतात की काय असा प्रश्न अमळनेरकरांना उपस्थित झाला आहे.

विक्की जाधव अमळनेर

९१७ ५०५ ०३००

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!