शेटफळगडे येथील चोरीचे प्रमाण काही घटेना चोरांना मात्र शेटफळ चा मोह सुटेना…
प्रतिनिधी:- प्रा.तुषार वाबळे
गेल्या महिन्यापासून शेटफळगडे येथील चोरीच्या घटनांमध्ये भरमसाठ वाढ झाली असून यावरून असे दिसत आहे की चोरांना हे गाव खूपच आवडले आहे. यामुळे रात्रीच्या चोरीच्या प्रमाणात वाढ तर होतीच होती परंतु आता तर चोरांनी कहरच केला शेटफळगडे येथील जगताप वस्ती वरती दिवसाढवळ्या एका घरावर दरोडा टाकत चोरांनी महिलेला चाकूचा धाक दाखवून, रोख रक्कम 20000 तर घरातील सोने चांदी व इतर वस्तू अंदाजे एकूण रक्कम 567500 चोरून नेत पोलिसांसमोर एक मोठे आव्हानच उभे केले आहे .याबाबत शेटफळगडे येथील जगताप वस्तीवरील सौ. भाग्यश्री अक्षय जगताप राहणार जगताप वस्ती शेटफळगडे ता. इंदापूर जि. पुणे यांनी भिगवण पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्याबाबतची तक्रार दाखल केली आहे. अशा घटनांमुळे शेटफळगडे येथील स्त्रियांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे .शेटफळगडे वासियांची झोप आता पुरती संपलेली आहे. रात्रभर जागरण करून दिवसा झोपणे देखील चोरांनी अवघड करून टाकलेले आहे. यामुळे या चोरांवरती आता काय प्रतिबंध घालता येईल याबाबत पोलीस प्रशासन तसेच ग्राम प्रशासन काय ठोस पावले उचलतील यांच्याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच चोरीच्या घटनेतील दोन्ही चोरांची रेखाचित्र तयार करून पोलिसांनी ती प्रसिद्ध केली आहेत. यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. सदर आरोपी कुठे दिसल्यास नागरिकांनी त्वरित याबाबतची माहिती बघून पोलीस ठाणे येथे द्यावी असे आव्हान करण्यात आले आहे. वरील अज्ञात चोरटे यांचे बाबत काही माहीती मिळाल्यास तात्काळ भिगवण पोलीस स्टेशन येथे खालील नंबरवर संपर्क साधुन माहीती दयावी. माहीती देणारे यांचे नाव गुप्त ठेवण्यात येवून त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल. तरी सहकार्य होणेस विनंती आहे.
संपर्क
भिगवण पोलीस स्टेशन, फोन नं. ०२११८/२४६२३३
श्री. विनोद महांगडे, सपोनि भिगवण पो.स्टे मो.नंबर श्री. रूपेश कदम, पोसई, भिगवण पो.स्टे.मो.नंबर ९४२२१५००५० ९४२२९७७१२६