न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

विवाह समारंभात केला मतदानाचा संकल्प …..!.

अपनी भाषा में पढ़े! Translate

विवाह समारंभात केला मतदानाचा संकल्प …..!.
प्रतिनिधी:- प्रा तुषार वाबळे
अलीकडचे काळात मतदारांमध्ये मतदानाबाबत असलेला निरुत्साह आणि त्यामुळे मतदानाचे कमी होत असलेले प्रमाण आणि मतदान करणे हे लोकशाही बळकट करण्याचे काम आहे हे लक्षात घेऊन येत्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा संकल्प भिगवण येथे संपन्न झालेल्या एका विवाह समारंभात करण्यात आला.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे विभागीय संघटक राजकुमार मस्कर यांचा मुलगा ओंकार आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड पांडुरंग जगताप यांचा पुतण्या व नामदेवराव जगताप यांचे चिरंजीव आतिश याचा शुभविवाह भिगवण येथील श्याम गार्डन या मंगल कार्यालयात गुरुवार दिनांक १८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. त्या विवाह सोहळ्यात उपस्थित सर्वांनी मतदानाचा संकल्प घेण्याचा एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला. विवाहपूर्वी दोन्ही वर-वधूंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन नंतर सर्वांना मतदानाचा संकल्प देण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांनी आपला उजवा हात समोर करून येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करून योग्य तो उमेदवार निवडून देण्याचा संकल्प केला. लोकशाही बळकट करण्याचे दृष्टीने अशा प्रकारचे उपक्रम उपयुक्त असल्याचे मत अ. भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी यावेळी व्यक्त केले. विवाह समारंभातील मान-पान, सत्कार समारंभ इत्यादी गोष्टींना फाटा देऊन राजकुमार मस्कर व नामदेवराव जगताप यांनी २१००० रुपयाचा धनादेश छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयातील ग्रंथ खरेदी करण्याकरिता इंदापूर न्यायालयातील सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती स्वानंदी वडगावकर श्री के सी कलाल साहेब व श्रीमती शितल साळुंखे तसेच इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष माधव शितोळे यांच्या हस्ते वाचनालयाचे पदाधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द केला सदर विवाह समारंभातील या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!