न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या आणखी एका पदाधिकाऱ्याचा पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी :- एकेकाळी करमाळा तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. शिवसेनेचे करमाळा तालुक्यातून आज पर्यंत तीन आमदार झालेले आहेत. परंतु गटातटाच्या राजकारणाने शिवसेना पक्ष संपूर्णपणे पोखरला गेला आहे. गत विधानसभेच्या निवडणुकीत नारायण पाटील यांना शिवसेनेचे विद्यमान आमदार असतानाही पक्षाने त्यांना उमेदवारी डावलून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल कोलते यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली होती. तेव्हापासून शिवसेनेत अंतर्गत गटबाजी उफाळून येताना दिसत आहे. उमेदवारी डावलल्या नंतरही नारायण पाटील हे अपक्ष उभा राहत दोन नंबरची मते घेत आपला तालुक्यातील असलेला दबदबा कायम राखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत काम करीत राहिले. परंतु लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी महायुती ऐवजी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करीत पक्षातील सदस्यत्वा पासून सर्व पदांचा राजीनामा दिलेला आहे. आता पक्षातील दुसरे महत्त्वाचे शिलेदार म्हणून ओळखले जाणारे तालुका प्रमुख देवानंद बागल यांनीही पक्षांतर्गत कुरघोडीला वैतागून राजीनामा दिलेला आहे. पक्षातील गटबाजी न थांबल्यास आगामी काळात करमाळ्यातील शिवसेना फक्त नवालाच उरेल का? हा ही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच शिवसेनेतील अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी करमाळा तालुक्यातील सुरू झालेली पक्ष गळती कशा रितीने रोखतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!