न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

माळेगांव खुर्दमधे घड्याळापेक्षा तुतारीचाच बोलबाला…

अपनी भाषा में पढ़े! Translate

माळेगांव खुर्दमधे घड्याळापेक्षा तुतारीचाच बोलबाला…
.
बारामती ( सह-संपादक – संदिप आढाव)

बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द हे गाव राजकीय पुढारी वगळता संपूर्णपणे खा.शरद पवार व खा.सुप्रिया सुळे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचे चित्र पहायला मिळाले.
आज कान्हेरी ता.बारामती जि.पुणे येथे खा.सुप्रिया सुळे यांचा प्रचाराचा नारळ खा.शरद पवार यांनी आ.रोहित पवार,आ.संजय जगताप,युगेंद्र पवार यांच्यासह सर्व पवार कुटुंबातील व्यक्ती, घटक पक्ष यांच्या उपस्थितीत पार पडला.
यानंतर थेट श्री यमाई देवी मंदिर माळेगांव खुर्द दर्शन घेऊन सभा संपन्न झाली.या सभेत त्यांनी गेल्या १५ वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली.यावेळी कांदा निर्यात, दुधाचे घसरलेले दर या विषयावर परखड मत व्यक्त केले.त्यांनी तुतारीवाला माणूस या चिन्हावर मतदान करायचे असे आवाहन केले.
दरम्यान माळेगांव खुर्द येथे असलेले कृषी विज्ञान केंद्र, राष्ट्रीय अजैविक ताण संस्था या खऱ्या अर्थाने खा.शरद पवार यांनी स्थापन केलेल्या संस्था आहेत.या संस्थेत अनेकांना रोजगार मिळत असल्याने बहुतांश जनता हि शरदचंद्र पवार यांच्याकडे असल्याचे दिसून येते.
चौकट –
माळेगांव खुर्द सारख्या गावात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व कारखाना संचालक अशी दोन महत्त्वाचे अजित पवार गटाचे पदे आहेत.मात्र या दोन्ही पदावरील व्यक्ती या निष्क्रिय आहेत.सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आले आहे.
यामुळे पुढाऱ्यांना अप्रत्यक्षपणे वगळून जनता हि शरदचंद्र पवार यांच्या कडे अधिकचा कल असल्याने घड्याळ बंद पडुन तुतारी वाजण्याची अधिक शक्यता आहे.तर १९०० त्यापैकी १६००-१७०० मतदान तुतारीस मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!