सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार – रघुनाथ निकम (शिवसेना पक्ष संचलित शिव-आरोग्य सेना बारामती तालुका प्रमुख…
.
बारामती ( सह-संपादक – संदिप आढाव)
महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा.सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी जिवाचं रान करुन युती धर्माचे पालन करु असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संचलित शिव आरोग्य सेना बारामती तालुका प्रमुख रघुनाथ निकम यांनी सांगितले.
माळेगांव शिवनगर येथील रघुनाथ निकम यांच्या घरी खा.सुप्रिया सुळे यांनी सदिच्छा भेट घेऊन निकम कुटुंबाचे आदरातिथ्य स्विकारले.यावेळी नितीन तावरे, गौरव जाधव, गणेश शेंदरकर, दत्तात्रय निकम व निकम कुटुंब उपस्थित होते.
यावेळी रघुनाथ निकम म्हणाले की, उध्दव ठाकरे साहेब यांचा प्रत्येक शिवसैनिक खा.सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी झटेल.राजकिय परिस्थिती कशी असली तरी खा.सुप्रिया सुळे यांना विजयी होण्यापासून कोणी ही रोखु शकणार नाही.
दरम्यान निकम कुटुंबाने केलेलं आदरातिथ्य कायम स्मरणात राहील.स्व.बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या कडवट शिवसैनिकाला भेटल्याचे समाधान वाटत असल्याचे खा.सुप्रिया सुळे यांनी सांगितले…