November 21, 2024 5:29 pm

अमळनेर येथे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण झाले संपन्न.

अपनी भाषा में पढ़े! Translate

जळगाव लोकसभा मतदार संघातर्गत 015 अमळनेर विधानसभा मतदार संघातील येत्या 13 मे रोजीच्या निवडणुक कामी नियुक्त मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे सकाळी 9.00 व दुपारी 3.00 वाजता अश्या दोन सत्रात प्रशिक्षण एन.टी.मुंदडा ग्लोबल व्हीव इंग्लीश मेडीयम स्कुल, अमळनेर येथे प्रशिक्षण आयोजीत करण्यात आलेले होते. प्रथम सत्रात एकुण 831 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजीत करण्यात आलेले होते त्यापैकी 56 गैरहजर होते. तर दुसऱ्या सत्रात एकुण 954 मतदान कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजीत करण्यात आलेले होते त्यापैकी 61 गैरहजर होते. दोन्ही सत्रात उपस्थित सर्व मतदान अधिकारी व मतदान कर्मचारी यांना 34 क्षेत्रीय अधिकारी व तलाठी कर्मचारी यांनी प्रशिक्षण व मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक देण्यात आले. त्या दरम्यान लोकसभा निवडणुक मतदान प्रकियेकामी नियुक्त अधिकारी व कर्मचारी पैकी गैरहजर एकुण 117 गैरहजर कर्मचारी यांना लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये कारवाई करणेबाबत नोटीसा बजाविण्यात आलेल्या आहेत. उपस्थित सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना प्रशिक्षण दिल्याबाबत प्रमाणपत्र घेण्यात आले व निवडणुक प्रकियेवर आधारीत 25 प्रश्नांची बहुपर्यायी लेखी परिक्षा घेण्यात आली. तसेच मतदान प्रकियेसाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी मतदान प्रकियेपासुन वंचीत राहु नये यासाठी त्यांना टपाली मतपत्रीका व निवडणुक कार्य प्रमाणपत्र चे अर्ज भरुन घेण्यात आले. नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना त्यांचा मतदार यादी क्रमांक व अनुक्रमांक शोधण्यासाठी हेल्प डेस्क ची व्यवस्था करण्यात आली होती. सदर प्रशिक्षणाच्या वेळीस मा. श्री. आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी जळगाव यांनी भेट देऊन कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी अमळनेर व रुपेशकुमार सुराणा तहसिलदार अमळनेर यांनी प्रशिक्षण दरम्यान मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणाची जबाबदारी निवडणुक नायब तहसिलदार प्रशांत धमके, आर.एस. जोशी नायब तहसिलदार उपविभागीय अधिकारी कार्यालय, संतोष बावणे पुरवठा अधिकारी अमळनेर, आर.आर.ढोले संगायो नायब तहसिलदार, डी.आर. सैदाणे प्र.नायब तहसिलदार महसुल, नितीन ढोकणे निवडणुक महसुल सहाय्यक, मुकेश काटे महसुल सहाय्यक, अक्षय सातपुते ऑपरेटर, पी.एस.पाटील मंडळ अधिकारी, विठ्ठल पाटील मंडळ अधिकारी, व इतर मंडळ अधिकारी, तलाठी, महसुल सहाय्यक, शिपाई व कोतवाल कर्मचारी यांनी पार पाडली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!