रमजाननिमित्त माळेगाव येथे रविराज तावरे मित्र परिवाराच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन
बारामती (प्रतिनिधी- अश्लेषा कदम)
रमजाननिमित्त माळेगाव बुद्रुक. तालुका बारामती येथील प्रसिद्ध जामा मस्जिद मध्ये रविराज तावरे लाखे मित्र परिवाराच्या वतीने माळेगाव परिसरातील मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये, मुस्लिम बांधवानद्वारे रोजाच्या माध्यमातून उपवास केले जातात. रोजा मुस्लिम बांधवांना संयम, त्याग, मनःशांती बहाल करतात त्याद्वारे समाजामध्ये मुस्लिम बांधव आपल्या वर्तणुकीतून एक आदर्श निर्माण करत असतात त्यामुळे रमजानच्या पवित्र महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असल्याचे राष्ट्रवादी युवा नेता रविराज तावरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशव जगताप, माजी चेअरमन रंजन तावरे, दत्तात्रय येळे, रमेश गोफणे सुखदेव हिवरकर, संजय भोसले, जयदीप विलास तावरे, प्रमोद तावरे, कल्याण पाचंगणे इत्यादी उपस्थित मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.