राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार च्या माळेगाव शहर अध्यक्षपदी नितीन तावरे यांची निवड
बारामती (सह संपादक – संदिप आढाव)
माळेगाव बुद्रुक येथील खासदार शरदचंद्र पवार यांचे कट्टर समर्थक आणि शेतकरी कुटुंबातील लढवय्ये युवा नेतृत्व नितीन तावरे यांची माळेगांव शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
गोविंद बागेत त्यांना पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी प्रचार प्रमुख सदाशिव सातव, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड .राजेंद्र काटे, तालुका अध्यक्ष एस. एन .जगताप, तसेच ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे, नगरसेवक सूरज सातव, जिल्हा सरचिटणीस अमित तावरे, तालुका कार्याध्यक्ष गौरव जाधव, श्रीहरी येळे इत्यादी उपस्थित होते.
दरम्यान माझ्या सारख्या सर्व सामान्यांच्या घरातील युवकावर खा.शरद पवार व खा.सुप्रिया सुळे यांनी टाकलेल्या विश्वासामुळे प्रचार प्रमुख सदाशिव सातव, तालुका अध्यक्ष एस .एन. जगताप ,तसेच ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम निष्ठेने करून माळेगाव व परिसरामध्ये पक्ष वाढीचे काम तळमळीने करणार तसेच तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह घराघरात पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असे नितीन तावरे यांनी सांगितले.