भैवनाथ विद्यालयातील “कोळी गीताची” निवड थेट सातार मधील संथेच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी..
प्रतिनिधी:- प्रा तुषार वाबळे
भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने, संस्थेच्या पाचही विभागामार्फत निवडक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात.त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निवड यादीत भैरवनाथ विद्यालय भिगवण ता. इंदापूर जि.पुणे या विद्यालयाने अत्यंत चांगला सहभाग घेऊन विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कोळीगीत सादर केले. त्यामध्ये विभागातून दुसऱ्या क्रमांकाने विद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची निवड झाली.त्याबद्दल सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक,शिक्षिकांचे, स्थानिक स्कूल कमिटी तसेच शाळा व्यवस्थापन व विकास समिती सदस्य व परिसरातून तसेच संस्थेच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागाचे सहसचिव श्री. बी. एन.पवार, त्याच बरोबर पश्चिम विभागीय अधिकारी श्री किसन रत्नपारखी , सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. एस.टी पवार यांच्याकडून कौतुक होत आहे . त्याचबरोबर विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ सोनवणे एस.व्ही. विद्यालयाचे प्राचार्य श्री भोसले व्ही.बी. व सर्व सेवक,शिक्षकेतर सेवकवृंद आणि पालक , ग्रामस्थ यांचे कडून हार्दिक अभिनंदन व कौतुक होत आहे.