June 30, 2025 2:36 pm

चक्क ग्रामसेवकाने ५० हजार रुपये व कागदपत्रे चोरून नेल्याची घटना शहरात घडली.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर ग्रामसेवकाने चक्क मोटरसायकल
मधील ५० हजार रुपये व कागदपत्रे चोरून नेल्याची घटना
शहरात घडली.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
झाल्याने पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.

विजय कैलास पाटील रा लोंढवे हा ठेकेदारीची कामा साठी अमळनेरांत येत
असतो. त्याने हेडावे येथील काम घेतले आहे. ११ मार्च रोजी
विजय पाटील राजभवन जवळ लावलेल्या
मोटरसायकल मधून ५० हजार रुपये व रस्त्याची मोजमाप पुस्तिका आणि महत्वाची कागदपत्रे
गायब झाल्याचे उघडकीस आले. विजय पाटील याने
त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहिले
असता त्यांना हेडावे येथील ग्रामसेवक जितेंद्र विनायक
पाटील याने
मोटारसायकल MH 19. AH 8529 वर लावलेली
पिशवी मधील कागदपत्रे व पंप हाऊस ची ५० हजाराची
रक्कम काढून घेतली. त्यांच्याकडे रकमेची वारंवार मागणी
करूनही ती रक्कम दिली नाही म्हणून विजय पाटील यांनी
पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने ग्रामसेवक विरुद्ध
चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.असे तपास
हे. कॉ. चंद्रकांत पाटील करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!