शेळी बांधण्यास सांगितले. त्याचा राग येऊन मारून टाकण्याची दिली.धमकी तालुक्यातील नदंगाव येथील घटना…
अमळनेर विक्की जाधव.
अमळनेर तालुक्यातील नदंगाव येथे मुरलीधर शांताराम
पाटील हे कुटुंबासह राहतात. ते, त्यांची पत्नी, त्यांच्या तीन
मुली व एक मुलगा असा परिवार राहतो. १९ रोजी मुरलीधर
पाटील यांचा मुलगा गणेश हा गुरांचा चारा घेऊन घरी
आला असता त्यांच्या घरशेजारील त्याचे काका कैलास
पाटील यांची शेळी तो चारा खात असल्याने त्याने काकांना
शेळी बांधण्यास सांगितले. त्याचा राग येऊन कैलास
पाटील यांनी पुतण्या गणेश त्याची बहीण चैतन्या, कीर्ती व
प्रीती यांना चापटा बुक्यांनी मारहाण केली तसेच मारून
टाकण्याची धमकी दिली.
मुरलीधर पाटील व त्यांची पत्नी छाया हे संध्याकाळी
शेतातुन आल्यावर मुलांना झालेल्या मारहाणीचा जाब
विचारायला गेल्यावर कैलास पाटील त्यांची पत्नी रजूबाई व
मुलगा उमेश यांनी मुरलीधर पाटील व त्यांच्या कुटुंबाला
पुन्हा मारहाण केली तसेच चैतन्या, कीर्ती व प्रीती यांचा
विनयभंग करून अश्लील शिवीगाळ केल्याने तिघांविरोधात
अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील करीत आहे.