July 1, 2025 4:04 am

बँकेचे रिकव्हरीचे काम करणे झाला गुन्हा ………

अपनी भाषा में पढ़े! Translate

बँकेचे रिकव्हरीचे काम करणे झाला गुन्हा ……….
रिकव्हरीची नोटीस वाटण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्याचा वाटेत खून.!!!

प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158

दौंड – बँक ऑफ महाराष्ट्र बारामती शाखा या बँकेत खाजगी तत्त्वावर रिकव्हरी नोटीस चे वाटप करणारे प्रवीण मळेकर हे दिनांक 1/3/2024 रोजी सकाळी 9:15 च्या सुमारास हिरो होंडा पॅशन मोटरसायकल नंबर एम एच 12- EP 9336 या गाडी वरुन रिकवरी नोटीस वाटप करण्यासाठी घरातून निघाले असता त्यांना कोणी तरी अज्ञात व्यक्तीने चाकू मारला व त्यांना जखमी केले असे ऋषिकेश प्रवीण मळेकर यांनी दौंड पोलीस स्टेशन येथे आपली फिर्याद दिली की ऋषिकेश यांना एक फोन आला व प्रवीण मळेकर आपले कोण आहेत त्यांना कोणीतरी चाकू मारून जखमी केले आहे आम्ही त्यांना विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर येथे ॲम्बुलन्स मधून पाठवून देत आहोत तुम्ही तेथे जाऊन थांबा असे सांगण्यात आले त्यानंतर हा प्रकार कोठे व कधी घडला असे विचारले असता त्यांनी सदर प्रकार वासुंदे गावच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपा समोर बारामती फलटण रोडवर झाला असल्याचे सांगितले रात्री नऊ वाजून पाच मिनिटांचा सुमारास विश्वराज हॉस्पिटल येथे पोहोचल्यानंतर त्यांना ॲम्बुलन्स मधून हॉस्पिटल मध्ये आणले गेले होते त्यानंतर वडील मळेकर यांना पाहिले असता त्यांचा पोटात कोणीतरी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने पोटात चाकू मारले असल्याचे दिसले त्यामुळे पोटातील आतड्या बाहेर आल्याच्या दिसल्या व पाठीवर कमरेवर वार झालेले सुद्धा दिसले वडिलांना आवाज मारला, हाका मारल्या असता त्यांनी कोणत्या प्रकारचा प्रतिसाद दिला नाही व हालचाल केली नाही त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून पाहिले असता ते उपचारापूर्वीच मयत आहे असे घोषित केले कोणीतरी धारदार हत्याराने वडिलांना जीवे ठार मारून त्यांचा खून केल्याचे दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून त्यासाठी एक पी आय तीन पीएसआय आणि 15 कर्मचारी असे पोलिसांचे टीम या मध्ये काम करत आहे असा घटना घडल्यामुळे बँकेचे वसुली करण्याचे काम करावे की नाही असे जोरदार चर्चा वसुली एजंट कर्मचारी आणि नागरिकांमध्ये होत असल्याचे समजते.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!