जे कधी शाळेत गेलेच नाहीत त्यांना शिक्षणाचे महत्व काय करणार श्याम पाटील.
शिक्षण महत्वाचे कीं क्रिकेट..
आपल्या भविष्याबाबत जागरूक नागरिकांना कदाचित थोडी ही नसावी का जाण..
काल अमळनेर येथील प्रताप कॉलेज येथे झालेल्या नामदार चषक आणि बारावीचा पेपर एकाच वेळी असल्याने शहरात चर्चेला चांगलाच उधान आले होते.
एकीकडे बारावीचा गणित विषयाचा पेपर सुरू असताना देखील क्रिकेट प्रेमींनी कॉलेजच्या ग्राउंड वरच फोडले मोठ-मोठे बॉम्ब (फटाके) आणि वाजवला डीजे.
याबाबत परीक्षार्थी असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक आणि सुजन नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तर
जे कधी शाळेत गेलेच” नाहीत त्यांना शिक्षणाचे महत्व काय कळणार. असे संभाजी ब्रिगेडचे श्याम पाटील यांनी मार्मिक शी बोलताना सांगितले.
नामदार चषकच्या आयोजकांनी नियमांचे केले उल्लंघन बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना कॉलेज कंपाउंड पासून 200 मीटर च्या आत कोणत्याही प्रकाराचे जमावबंदी, परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्रास होईल अशा प्रकारच्या ध्वनी वाजवणे, आणि मोठे कर्कश आवाज होईल असे फटाके फोडणे अशा प्रकारचे निर्बंध असताना देखील प्रताप कॉलेजच्या ग्राउंड वर चं आमदार चषक सुरू असताना अशा गोष्टी घडल्यामुळे सुजाण नागरिकांनी आणि परीक्षा आर्थिक विद्यार्थी पालक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.