July 1, 2025 1:00 pm

करमाळा नगरपरिषदेतील निष्कलंक व्यक्तिमत्त्व असलेले अजमोद्दीन शेख आज सेवानिवृत्त

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) – करमाळा नगरपरिषदेतील कर्मचारी अजमोद्दीन हाशमोद्दीन शेख हे आज दि. 29/02/2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. अजमोद्दीन शेख यांनी करमाळा नगरपरिषदेत कार्य करीत असताना सर्व सामान्य घटकांना एकत्रित करीत उल्लेखनीय कार्य केल्याने त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे त्यांना निरोप देताना अनेक सफाई कर्मचारी, झाडू कामगार, महिला बचत गटातील सदस्या तसेच इतर अधिकारी भावविवश झाले पहायला मिळाले. शेख यांनी करमाळा नगरपरिषदेत आजपर्यंत विविध ठिकाणी कार्य केले आहे. त्यामध्ये त्यांनी आरोग्य विभागामध्ये मुकादम म्हणून काम करताना स्वत: जातीने लक्ष देवून नागरिकांच्या स्वच्छतेबाबतच्या समस्यांचे निवारण केलेले होते. तसेच त्यानंतर त्यांना सुवर्ण जयंती विभागात त्यांची बदली केल्यानंतर महिलांच्या उन्नतीसाठी बचत गटांच्या माध्यमातून उत्तम असे कार्य केलेले आहे. अनेक महिला बचत गटांचे हिशोब ठेवणे त्यांना व्यवसायासाठी कर्जे उपलब्ध करून देणे, महिलांना सक्षमीकरणासाठी शिबीरे राबविणे तसेच विविध सांस्कृती कार्यक्रमांचे आयोजन करणे व त्यामध्ये सर्व घटकांना सामावून घेणेचे काम त्यांनी आजवर केलेले आहे. सध्या ते सामान्य प्रशासन विभागात मदतनीस म्हणून कार्यरत होते. या विभागातही त्यांनी त्यांच्या कार्याचा अलौकीक ठसा उमटविला आहे. सामान्य प्रशासन विभागात कर्मचाऱ्यांची इत्तंभूत माहिती अद्यावत ठेवलेली आहे. शेख यांनी आजवर कोणत्याही कर्मचारी, नागरीक अथवा महिला बचत गटातील सदस्यांकडून आर्थिक व्यवहार, भ्रष्टाचार न केल्याने त्यांचे संपूर्ण नगरपरिषदेतील प्रतिमा स्वच्छ राहिलेली आहे. त्यांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच विविध स्तरातील मान्यवरांच्या हस्ते शेख यांचा सन्मान करण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!