July 1, 2025 8:16 am

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत प्रताप हायस्कूल मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण संपन्न !

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत प्रताप हायस्कूल मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण संपन्न !

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत अमळनेर येथील प्रताप हायस्कूल मध्ये २६ ते २८ दरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना दर्जेदार, गुणवत्ता पूर्ण शिक्षण सामाजिक मूल्ये, पर्यावरण पूरक आणि व्यवसायिक शिक्षण दिले गेले पाहिजे यासाठी शिक्षकांना नवनवीन तंत्रज्ञान शिकवण्यात आले. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी निरंजन पेंढारे, प्रमिला अडकमोल, डॉ भाग्यश्री वानखेडे, सुहास खांजोळकर, संजय सैंदाणे, असमालोद्दीन काझी, किरण सनेर, जी एम पाटील, दिनेश निघोट यांनी शिक्षकांना प्रशिक्षण दिले.
विद्यार्थ्यांची उन्नती म्हणजे समाज आणि राष्ट्राची उन्नती होय. विद्यार्थी शाळेत फक्त शिकून उपयोग नाही तर तो देशाचा आदर्श नागरिक होण्यासाठी त्याच्यात बीजे रोवली गेली पाहिजे, आणि हाच प्रयत्न शिक्षकाचा असावा, शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा उद्देश हाच आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी
प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!