July 1, 2025 1:35 pm

देशवासियांना जोडून ठेवणारी पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा ११० वा ‘मन की बात’ – धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची वाणी ऐकायला मिळणं, ही एक पर्वणीच ! ‘मन की बात’च्या माध्यमातून नरेंद्रजी मोदींनी हा पूर्ण देश जोडून ठेवल्याचे धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी म्हटले आहे. देशाचे यशस्वी, सक्षम आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी रविवार दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी “मन की बात” या कार्यक्रमातून देशातील नागरिकांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जनतेशी थेट संवाद “मन की बात” भाग ११० वा भाग आॅल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून थेट प्रसारण दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता झाला. प्रत्येक देशवासियांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम होता. त्यावेळी मोलाचे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केले. शिरपूर येथील प्रभाग क्रमांक ६, बुथ नंबर- १९० येथे मन की बात कार्यक्रम उत्तर महाराष्ट्र संयोजक तथा धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा जनसंपर्क कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र ‘मन की बात’ कार्यक्रम पाहिला. बबनराव चौधरींसोबत, मोदीजींचे विचार अनुभवले.

यावेळी त्यांच्या समवेत धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, मुकेश पाटील, माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप राजपुत, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप धमाणी, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, शहराध्यक्ष नंदु माळी, भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष लोटन पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, संदीप करंके, जाकीर तेली, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अजिंकेय शिरसाठ, शहराध्यक्ष विक्की चौधरी, आयुष्यमान भारत योजना आघाडी जिल्हाध्यक्ष राजुलाल मारवाडी, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष पप्पु राजपुत, राजस्थान प्रकोष्ठ तालुका संयोजक भुपेश अग्रवाल, राजु शेख (एजंट), नाहिद मलिक, अशोक माथणे, अनिल बंशी आदि पदाधिकारी उपस्थित होते. मन की बात हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे या देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळते, त्यासोबतच देशासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या प्रत्येक सर्व सामान्य व्यक्तीचाही मोदीजींकडून गौरव केला जातो असे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!