July 1, 2025 8:24 am

शहराची शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करा अन्यथा अमळनेर शहर करू बंद

अपनी भाषा में पढ़े! Translate

शहराची शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करा अन्यथा अमळनेर शहर करू बंद

अमळनेर गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या गुन्हेगारीबाबत जनमाणसात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . सराईत गुन्हेगार शुभम देशमुख याला अटक न केल्यास १ रोजी अमळनेर शहर बंद ठेवण्याचा निर्णय मराठा मंगल कार्यालयात झालेल्या नागरिक व व्यापाऱ्यांच्या
बैठकीत घेण्यात आला.
लक्झरीचालक जयवंत पाटील यांच्यावर शुभम देशमुख याने जीवघेणा हल्ला केला. तसेच दादू धोबी याने चाकूचा धाक दाखवत एकला लुटले, स्टेशनरोड परिसरात झालेला जीवघेणा हल्ला आदी घटनांनी अमळनेर शहरात खळबळ माजली होती. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व्यापारी, दुकानदार व नागरिक एकत्र येत रविवारी मराठा मंगल कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीत माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, सचिव विक्रांत पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, संभाजी ब्रिगेडचे श्याम पाटील, धनंजय सोनार, व्यापारी भरत ललवाणी, राकेश माहेश्वरी, बाळू कोठारी, सुनील चौधरी, मनोज शिंगाणे, सचिन वाघ, शुभम बोरसे, शकील काझी, दिनेश पाटील, पोलिस नाईक डॉ. शरद पाटील यांनी आपल्या भूमिका मांडल्या. जखमी जयवंत पाटील यांचे वडील महेश पाटील यांनी मुलावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या शुभम देशमुख याला पर्यंत अटक न केल्यास दि.१ मार्चला डीवायएसपी कार्यालयासमोर आत्मदहन करेल, असा इशारा दिला. दि. १ रोजी सर्व व्यापारी, कानदारांनी
आणि नागरिकांनी अमळनेर बंद ठेवावे, असे आवाहन करताच सर्वसंमतीने होकार दिला. यावेळी पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी सांगितले की, मी नुकताच बदलून आलो आणि काही गुन्हेगार बाहेर आले. त्यांनी काही अक्षम्य गैरप्रकार केलेत. नागरिकांनी बिनधास्त तक्रार करावी. आणि पोलिस प्रशासनाल सहकार्य करावे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!