July 1, 2025 1:06 pm

मराठा समाजातर्फे मुलामुलींसाठी वस्तीगृह ,मोफत वाचनालय , बाल संस्कार केंद्र ,समुपदेशन केंद्र आणि वधुवर सूचक मंडळ स्थापन….

अपनी भाषा में पढ़े! Translate

मराठा समाजातर्फे मुलामुलींसाठी वस्तीगृह ,मोफत वाचनालय , बाल संस्कार केंद्र ,समुपदेशन केंद्र आणि वधुवर सूचक मंडळ स्थापन….

अमळनेर : तालुका मराठा समाजातर्फे मुलामुलींसाठी वस्तीगृह ,मोफत वाचनालय , बाल संस्कार केंद्र ,समुपदेशन केंद्र आणि वधुवर सूचक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील होते.
मराठा समाजाच्या उत्पन्नात ७९ लाख ५० हजार ५१४ रुपयांची वाढ होऊन १ कोटी ६ लाख रुपयांची वार्षिक आर्थिक उलाढाल झाल्याचे सांगितले. यावेळी मराठा समाज संचालक मंडळ , मनोज जरांगे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच आमदार मंगेश चव्हाण व शिवाजी शिंदे यांचा गौरव करण्याचा ठराव देखील मांडण्यात आला. मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पोलीस निरीक्षक किरण बकाले चा निषेध करण्यात आला. संस्थेचे कायमस्वरूपी स्टेज , भोजन टेबल , नवीन डोम , मराठा समाज महिला मंडळ , युवक मंडळ स्थापन करून कार्यालय भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढे सर्वजण उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!