करमाळा प्रतिनिधी – शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे शिवसेनेचे महाअधिवेशन दोन दिवसासाठी आयोजित केले होते. सदर अधिवेशनाकरिता करमाळा तालुक्यातून शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख देवानंद बागल, महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख नागेश काळे, युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, युवा सेना तालुका उपप्रमुख दादासाहेब तनपुरे, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड आदि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी सांगितले की, शिवसेनेने आयोजित केलेल्या महाअधिवेशन शिबीरमध्ये शासनाच्या योजना तळागाळपर्यंत पोहचविणे, निवडणूक काळातील यंत्रणा, शिवसेना पक्ष संघटनात्मक बांधणी, शैक्षणिक धोरण, शेतकरी विकासात्मक धोरण, महिला सक्षमीकरण धोरण, आरोग्यविषयक धोरण इ. बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केल्याने करमाळा तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी संपूर्ण अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडले असून अधिवेशनातील विचारांची शिदोरी करमाळा तालुक्यासाठी नवसंजीवनी ठरली असून यापुढे पक्षाचे विचार व संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे पदाधिकारी यांनी सांगितले.