राज्यस्तरीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन
निरा नरसिंहपुर: दिनांक-6, प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
भारतीय शालेय क्रीडा महासंघ मान्यता प्राप्त भारतीय वेल्फेअर युनिफाईड महासंघ यांच्या मान्यतेने युनिफाईड वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र व युनिफाईड वेल्फेअर असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या राज्यस्तरीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत राज्यातून साडेतीनशे विद्यार्थी पार्ट झाले. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याने भरभरीत यश संपादन केले. 14 वर्षे आतील विद्यार्थ्यां कार्तिक माळी गोल्ड मिडल, भूमी माळी सिल्वर मिडल, प्रज्ञा माळी गोल्ड मिडल वेगवेगळ्या कॅटेगिरी मध्ये त्यांनी आपले यश संपादन केले. प्रमुख प्रशिक्षक राष्ट्रीय पंच शंकर जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले. व पुढील वाटचालीसाठी त्यांना असोसिएशनचे अध्यक्ष सचिव इकबाल शेख सर, भीमराव बाळगे सर तसेच आमचे गुरु वाल्मीक जाडकर सर व जिचीन शतकोन असोसिएशन अध्यक्ष डॉ. सुहास खडके, विनोद नागटिळक, शंकर जाधव सर यांनी शुभेच्छा दिल्या.