धम्मझरी येथे भव्य धम्म समारंभ व सामाजिक समता सम्मेलन संपन्न
रजत डेकाटे – प्रतिनिधी नागपूर
भिवापूर तालुक्यातील बोटेझरी येथील धम्मझरी विपश्यना केंद्रात या भव्य धम्म समारंभ व सामाजिक समता सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक समता सम्मेलनात ध्वजरोहन करण्यात आले.
अष्टशील उपोषक कार्यशाळेचे आयोजन राजरतन कुंभारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या भव्य धम्म समारंभाला माजी आमदार सुधीर पारवे, सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ मेश्राम व रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय मेश्राम, रामटेके सर कुरखेडा, सामाजिक कार्यकर्त्या तक्षशिला वाघधरे यांची यावेळी मंचावर उपस्थिती.
यावेळी ज्ञानेश्वर दादा रक्षक यांच्या संत साहित्यात बुद्धांचा प्रभाव या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी शिवकाशी डेव्हलपर्स ॲड बिल्डर्स लोकमत आयकॉन पुरस्कार प्राप्त करणारे वसंतभाऊ डांगरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
ज्ञानेश्वर दादा रक्षक यांनी संत साहित्यात बुद्धांचा कसा रुजवायला हवा हे सामाजिक समता सम्मेलनात नागरिकांना सांगितले.
यावेळी धम्मझरी विपश्यना केंद्र ते बोटेझरी ५ कि.मी. मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दामोदर वानखेडे व देवाजी चाफले यांनी यावेळी सहभाग घेतला होता.
यावेळी घनश्यामजी फुसे, मनोहर वानखेडे, शितल सवाईमून, विलास मेश्राम, अरुण दोडके, गौतम भषारकर, मुकेश गायगवळी,मंगला डोंगरे, हेमलता अंबादे, सिंधू गणवीर, उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता मोहोळ यांनी केले तर आभार उध्दव खाडे यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदिप म्हैसकर, किशोर सवाईमून यांनी अथक परिश्रम घेतले..