हातात धारदार तलवार बाळगून तणावाचे वातावरण निर्माण करून एकाची दौंड परिसरात दहशत.
तलवारीसह १ गुंडास अटक दौंड पोलीसांची दबंग कारवाई.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
दौंड – धारदार तलवार जवळ बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीस दौंड पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेतले,गुरूदास निवृत्ती राऊत (रा.राघोबानगर, गिरीम दौंड ) असे नाव असणाऱ्या व्यक्तीवर भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) प्रमाणे गुन्हा दाखल केला.’दि.४ रोजी दौंड पोलिसांना माहिती माहिती मिळताच धारदार तलवार बाळगून दौंड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्यास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची टीम ने संबंधित इसमाला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेली धारदार तलवार ताब्यात घेऊन दौंड पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला आहे. उघडपणे धारदार तलवार बाळगुण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करून व दहशत माजवून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे कृत्य करताना कोणी आढळले तर तात्काळ दौंड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, पोलीस नाईक विशाल जावळे, आदेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते आदींनी केली.