मालेवाडा येथील शेतकऱ्यांचे वनविभागाला निवेदन
वन्य प्राण्यांच्या प्रभावामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
✒️ रजत डेकाटे -नागपूर प्रतिनिधी
मालेवाडा :- प्राण्यांच्या वाढत्या प्रभावामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.शेतात जाऊन पीकाकडे पाहण्याची इच्छा सुध्दा संपल्याच्या स्थितीत आहे.
मालेवाडा येथील शेतकऱ्यांनी उमरेड येथील वनविभागावर आक्रोश मोर्चा काढत वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त कडे वनविभागाने लक्ष द्यावे.
शेतातील पिकांचे खूप नुकसान झाले आहे याची नोंद करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी वनविभागाला केली आहे.
आणि वनविभागाकडूनजी नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया आहे ती कठीण असल्यामुळे शेतकरी अर्ज सुध्दा करीत नाही.
शेतकऱ्यांची मागणी केली आहे की ग्रामपंचायत मध्ये याचे शिबिर लावून शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे अर्ज वनविभागाने स्व:त भरावून द्यावे आणि तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याकरिता आपल्या जंगलाला कुंपण करुन घ्यावे असे पिडित शेतकऱ्यांने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मनोहर वानखेडे, विघ्नेश्वर रामटेके, दामोधर इंगोले, विलास मेश्राम, वसंता सवाईमून, पंजाबराव इंगोले, राहुल गोवारदिपे, शितल सवाईमून, गुरूदेव चौधरी,रामु कडू, अनिल गोवारदिपे, रामचंद्र सहारे, वासुदेव लोणगाडगे, आनंदराव आंभोरे यावेळी आदी शेतकरी उपस्थित होते.