बहुजन समाज पार्टी दौंड यांनी साकारली हुबेहुब भीमा कोरेगाव विजय स्तंभाची प्रतिकृती.
विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी उसळला भीमसागर.
प्रतिनिधी / विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – दौंड शहरातील बहुजन समाज पार्टी दौंड विधानसभा यांच्या वतीने सालाबादप्रमाणे (वर्ष ७ वे) शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव विजयस्तंभाची हुबेहुब प्रतिकृती उभारून दौंड कर बहुजन समाजाला जणू काही आपण भीमा कोरेगाव ला असल्याचा भास निर्माण करून दिला.
यावेळी बसपा व दौंडकर नागरिकांकडून ५०० महार शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आली. यासाठी दौंड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी 30 फूट उंच विजयस्तंभ उभारला त्यासाठी 50 किलो फुले लागली आणि तब्बल ९ ते १० तास वेळ लागल्याचे सांगितले गेले. यावेळी विशाल सोनवणे अध्यक्ष- बसपा दौंड विधानसभा, तुषार सवाणे उपाध्यक्ष- बसपा दौंड विधानसभा तसेच अमन खान,हर्षल पाटोळे,राहुल कंकाळे वाहिद सय्यद,अभिजीत डेंगळे,अक्षय शिंदे,श्रीकांत माने,किरण जगताप, सकलेन खान,बबन थोरात,
सुनील शिंदे, विनायक ननवरे,
रवी वाल्मिकी, दत्ता तिगोटे,
केतन बुरुडे, राजेंद्र आढाव,
अरविंद पगारे, करण केदार,
मंगेश सोनवणे या सर्वानी स्तंभ उभारणीसाठी अथक परिश्रम घेतले व सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.