रेल्वेरुळांजवळच्या झोपड्यांचे सर्वेक्षण करून पुनर्वसन करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घ्यावा :
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात
रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या सोबत जानेवारीत बैठक घेणार
मुंबई दि.30 – रेल्वेरुळांजवळच्या झोपड्यांचे निष्कासन थांबवावे; गेली 40 वर्षांहून अधिककाळा पासून वसलेल्या झोपडपट्ट्यांचे निष्कासन थांबवून त्या सर्व झोपड्यांचे सर्वेक्षण करून किती झोपड्या आहेत तसेच किती झोपड्याया रेल्वे च्या जागेत आहेत. तसेच रेल्वेला पुढील काळात किती जागा विकासासाठी लागणार आहे याचे सर्वेक्षण केले जावे. रेल्वे रुळांजवळच्या झोपड्यांचा सर्व्हे करुन त्यांचे राज्य सरकार मार्फत पुनर्वसन करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला पाहिजे.त्यासाठी पुढील महिन्यात जानेवारी मध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या सोबत बैठक आयोजित करण्याचा निर्णय आज घेण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात आज रेल्वे रुळांजवळच्या झोपड्यांच्या प्रश्नावर ना.रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी रेल्वे चे विविध अधिकारी आणि राज्य शासनाचे अधिकारी उपस्थित होते.तसेच रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; सुरेश बारशिंग; मा.आ.विनोद घोसाळकर; रिपब्लिकन झोपडपट्टी आघाडी चे अध्यक्ष सुमित वजाळे; रिपाइं चे रतन अस्वारे; जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे; घनश्याम चिरणकर; वनिता वाघमारे; अनेक मान्यवर उपस्थित होते.
रेल्वेरुळांजवळ च्या झोपड्या आणि केंद्र सरकार च्या विविध विभागाच्या जागेवरील झोपड्या; वनजमिनी वरील झोपड्या आणि कांदळवनावरील झोपड्या या सर्व झोपड्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यासाठी नवीन वर्षात जानेवारीत केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे पाटील यांच्या सोबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन झोपडपट्टी आघाडी चे अध्यक्ष सुमित जी वजाळे यांनी दिली आहे. यावेळी रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे भीमराव कांबळे; राजू खरात; शेखर सुब्रमण्यम; दिनेश शिंदे;कृष्णा मिश्रा ; माणिक उघडे ( डोंबिवली) आदी पदाधिकारी उपस्थित होते.