November 21, 2024 5:47 pm

महाघोटाळेबाज दबंग लेडी डॉन उपायुक्त प्रियंका भरत राजपुत

अपनी भाषा में पढ़े! Translate

महाघोटाळेबाज दबंग लेडी डॉन
उपायुक्त प्रियंका भरत राजपुत
सौ.प्रियंका भरत राजपुत हे नाव घेताच भ्रष्टाचाराचे मूर्तीमंत रूप समोर दिसू लागते.”पैसा पैसा क्या करती है, पैसे पे क्युं मरती है ?” हे गाणं प्रियंका राजपुत यांची व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेऊन रचले गेले असावे, असे मला वाटते. पालघरला उपमुख्याधिकारी पदावर असताना लाच प्रकरणी हातात बेड्या पडल्यानंतर तरी या महिलेच्या वर्तनात फरक पडायला हवा होता. परंतू म्हणतात ना ! जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही अशीच वृत्ती प्रियंका राजपुत यांची आहे.
दबंगगिरीचा रोग ही त्यांना जडला होता. आयुक्तांपासून कोणालाही न जुमानणे, विरोधकांना “कुत्ते भोकते हजार हत्ती चले बाजार” सारखे उद्धटपणे बोलणे यात त्यांना मर्दुमकी गाजवल्यासारखे वाटते. तर खाजगी जीवन सार्वत्रिक करण्यात त्यांना मज्जा वाटते. या महिला अधिका-याच्या भ्रष्टाचाराबाबत मी वेळोवेळी पुराव्यानिशी लिहिल्यापासून त्यांची दबंगगिरी कमी झाली असली तरी भ्रष्टाचाराचा रोग बरा होण्याची चिन्हं काही दृष्टीपथास येत नाहीत.
मुख्यमंत्री व त्यांच्या ४० आमदारांवर ५० खोके एकदम ओक्के ! अशी टीका होत असते.मात्र या लोकांवर देखील मात करू शकेल असा ३०० खोक्यांचा घोटाळा करण्याचा प्रयत्न या भ्रष्टासूरीणीने केला. त्या बदल्यात २० टक्के प्रमाणे ६० खोके ही घेतले असे म्हटले जात आहे. ही महिला अधिकारी काही समाज सेवा करायला आलेली नाही, मंत्रालयात सेटींग करून थेट मालमत्ता कर उपायुक्त म्हणून उल्हासनगरच्या तिजोरीवर नजर ठेवत रूजू झाली. आल्यापासून तिने भ्रष्टाचाराचे थैमान घातले, तिचे अनेक भ्रष्टाचार मी उघडकीस आणले,परंतू कोणत्याही आयुक्ताची तिच्यावर कारवाई करण्याची हिंमत झाली नाही. किंबहूना तिच्यावर कारवाई करण्याची धमक कोणत्याही आयुक्तात नाही. डॉ.राजा दयानिधी तर तिला पुरस्कार देताना दिसले तर अजीज शेख हे अजीबो गरीब झाले. मंत्रालयातील कक्ष अधिकारीही तिच्यावर फिदा असल्यासारखे तक्रारी दडपून टाकण्यात धन्यता मानत होते. अशा या लेडि दबंग डॉनचा हा महा घोटाळा वाचून तुम्हीही दंग व्हाल.
उल्हासनगर महानगर पालिकेचे भूखंड खाजगी व्यक्तिंच्या नांवे करून कोट्यावधी रूपयांवर हात मारण्याचा प्रयत्न या लेडि डॉनने केला. कॅम्प नं.५ येथील स्वामी शांती प्रकाश इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळील एक प्रचंड मोठा भूखंड ज्याचे क्षेत्रफळ सुमारे ३० हजार चौरस वार इतके आहे, तो भूखंड सत्यपाल नावाच्या एका बिल्डरच्या नावे करण्यात आला.सुमारे ३०० कोटीचे बाजारमूल्य असलेला हा भूखंड बिल्डरच्या नावावर करण्यासाठी जी लाच दिली गेली असेल ती २० % दराने ६० कोटी इतकी होईल. भ्रष्टाचारात पारंगत प्रियंका राजपूत ही सुकी राहीली असेल यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. या कारस्थानात दस्तुरखुद्द दबंग लेडी प्रियंका, कोलब्रो कंपनीचा हस्तक जाफर नावाचा कर्मचारी व सदर लाभार्थी बिल्डर या त्रिकुटाचा सक्रिय सहभाग होता. परंतू हाय कंबक्त नशिब ! या वेळी प्रियंकाचा घात झाला. कानोकानी ही खबर फुटली. मग या लेडी दबंग डॉनची तारांबळ उडाली.
डाव उलटला व बिंग फुटल्यावर जी गत होते ती या लेडी डॉनची झाली. तत्पुर्वी ही माहिती वाचा : या मालमत्तेचा क्रमांक/ क्षेत्रफळ / थकित मालमत्ता कर या क्रमाने
57DOo22210300 / 45000 Sq.Ft./Rs. 5,15,947/=
57DO022210400/45000Sq.
Ft./Rs.6,26,239/=
57DO022210500/45000Sq.
ft./ Rs. 6,26,239/=
57DO022210700/45000Sq.
ft./Rs.5,15, 957/=
57DO0222210800/45000/Rs.5,15,957/=
ही मालमत्ता महापालिकेची असताना मालमत्ता कर विभागाने एका बिल्डरच्या घश्यात घालण्यासाठी उपायुक्त मालमत्ता कर श्रीमती प्रियंका राजपुत यांच्या स्वाक्षरीने
बिलं काढण्यात आली होती.परंतू हे प्रकरण ३०० कोटी इतक्या रकमेच्या भूखंडाचे असल्याने हे बिंग फुटले. मग आपल्या दबंग लेडी डॉनने एक शक्कल लढवली व सदर मालमत्तेच्या वेबसाईट वरील नोंदी हटवून त्या जागी मालक म्हणून “उल्हासनगर महानगर पालिका” असे नाव बदलून लावले. तिला वाटले आता प्रकरण मिटले. परंतू कोणताही गुन्हेगार कितीही शातिर असला तरी तो/ती पुरावा मागे सोडतोच.त्यामुळे जशी खुनाला वाचा फुटते तशीच भ्रष्टाचारालाही वाचा ही फुटतेच.
*दबंग लेडी स्वत:ला कितीही स्मार्ट समजत असली तरी तिने एक घोडचुक केली. सदर मालमत्ता महानगर पालिकेच्या नावावर दाखवताना तिने मालमत्ता कराची लाखो रूपयांची रक्कम थकबाकी देखील दाखवली.यातच तिने घोडचुक केली. महापालिकेच्या मालमत्तेस मालमत्ता कर लागू नसतो,हे त्या विसरल्या. इथेच तिची चोरी-लबाडी पकडली गेली.*
इतकं करून थांबेल तर ती प्रियंका राजपुत कसली ? तिने अजून एक शहाणपणा केला. महापालिकेचे बजेट ८०० कोटीच्या वर असताना या ६ मालमत्तांच्या थकित बिलाचे पार्ट पेमेंट म्हणून पावती क्रमांक ७३९३२ अन्वये मालमत्ता क्र. 57Do22210300 चे १ लाख रूपये भरले तर दुस-याच दिवशी मालमत्ता क्रमांक 57DO02221070 चे पार्ट पेमेंट पावती क्रमांक ७३९२६ अनुवये १ लाख व मालमत्ता क्रमांक 57DO022210800 चे पार्ट पेमेंट रूपये रूपये १ लाख भरले. हे ३ लाख कोणी भरले ? महापालिका किंवा प्रियंका राजपुत तर मुळीच भरणार नाही. रेकॉर्डवरून याचा शोध घेतला तर प्रियंका राजपुतचा भागिदार पार्टनर कोण आहे ? हे स्पष्ट होईल व सर्व खुलासा होईल.आयुक्त तशी तसदी घेतील का ?
*किती हा मुर्खपणा व हातचलखी ? महापालिकेच्या मालमत्तेस मालमत्ता कर लागू होत नसताना तो दाखवणे व त्याचे पार्ट पेमेंट स्विकारणे ही बुद्धी भ्रष्ट व मती भ्रमिष्ट झाल्याचेच द्योतक आहे.* हे सर्व पुन्हा लक्षात येताच वेबसाईट वरून हे रेकॉर्डही गायब करण्याचा मुर्खपणा या बाईने केला. म्हणजे ती किती निर्ढावलेली व बिनधास्त आहे, हेच सिद्ध होते.”सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली” अशी या महिलेची गत झाली आहे.
कोई लाख करे चतुराई
करमका लेख मिटे ना रे भाई
हे या भ्रष्टासूरीणीस लागू होते.
आत्ता प्रश्न उरतो आयुक्त व प्रशासक अजिज शेख यांचा. ते कारवाई करण्याची मर्दुमदी दाखवतात की, हतबलतेने व षंढपणे नांगी टाकतात.
या महिला अधिका-या विरोधात किती तरी तक्रारी आहेत. एकुण ९ निरिक्षकांकडून दरमहा ८ हजारचा हप्ता घेणे व मलईदार टेबलवरील बदलीसाठी २५ हजारापासून पुढे कितीही लाच घेणे, असे आरोप कर्मचारी दबक्या आवाजात करीत असतात. इतकी टीका व बदनामी होऊनही ही बया बदली मागून घेत नाही.
आयुक्तांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावे व तिच्या विरोधात इडीची कारवाई करण्याची शिफारस नगर विकास विभागास करावी, अन्यथा तेही या गटार गंगेत सामिल आहेत, असे समजायला हरकत नसावी.
दिलीप र.मालवणकर
९८२२९०२४७०
ज्येष्ठ पत्रकार

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!