जिद्दीने पोलीस अधिकारी झालेला अमोल कांबळे तरुण पिढीसाठी आयडॉल !
प्रतिनिधी भगवान लोंढे
इंदापूर महाविद्यालय येथे बीएससीचे शिक्षण पूर्ण करून फर्ग्युसन कॉलेजमध्ये एमएससीचे शिक्षण घेत असताना वडिलांचे अकस्मिक निधन आणि घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक संकटांचा सामना करत जिद्द बाळगून अमोल शिक्षण घेत राहिला पुणे येथे शिक्षण घेत असताना आर्थिक मदतीची गरज असल्यामुळे सामाजिक कार्य करणाऱ्या महिला एकत्र आल्या आणि दोन वर्ष अमोलला शिक्षणासाठी दत्तक घेऊन प्रा. जयश्री गटकुळ, उज्वला गायकवाड, कल्पना राऊत सविता बंगाळे, रतन पाडूळे, सुषमा जाधव, अशा अनेक महिलांनी आर्थिक मदत देऊन एमएससीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोलाची साथ दिली.अमोलने अथक परिश्रम घेत आपल्याला आयुष्यात काहीतरी साध्य करायचे आहे म्हणून अभ्यास केला आणि स्वतःची आर्थिक, सामजिक परिस्थिती बदलून टाकत केलेल्या सहकार्याची जाण ठेवून जीवनात यशस्वी होऊन कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षक झाला …ही कहाणी आजच्या युवकांसाठी खुप प्रेरणादायी आहे.. अमोल पुढील काळात आम्हाला विसरला तरी चालेल पण असहाय, गरीब विद्यार्थ्यांना मदत कर असे भावनीक आवाहन प्रा जयश्री गटकुळ यांनी केले. इंदापूर महाविद्यालयात प्राचार्य डॉ जीवन सरवदे यांनी अमोलचा एक झाड देउन सत्कार केला, पुढील युवा पिढीने उज्वल भवितव्यासाठी संघर्ष केला तर अशक्य गोष्ट शक्य होइल असे मत इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जीवन सरवदे यांनी व्यक्त केले.
अमोलने भावना व्यक्त करताना आयुष्यात नेहमीच खुप मोठ्या संकटांना तोंड देत झुंजावे लागले आहे, म्हणून संघर्ष करणे माझी पॅशन आहे, मला आता संघर्ष करणे आवडते, खडतर प्रवासात माझी आई,भाऊसाहेब कांबळे आणि नितीन कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.अशा शब्दात अमोलने भावना व्यक्त केल्या.