भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्याची पिळवणूक
रजत डेकाटे प्रतिनिधी नागपूर
भिवापूर तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतात कपासची मोठ्या प्रमाणात लागवड करीत असतात
आणि विक्री करीता जिनींग येथे आणत असतात.
भिवापूर बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांचे कपास खरेदी करते आणि त्यांची जिनींग तासला आहे.
शेतकऱ्याला व्यापाराच्या माल भिवापूर पासून पुन्हा तास नेऊन द्यावे लागते.
यात शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे.यात बाजार समिती डोळे झाकच प्रकार करीत आहे.
शेतकऱ्याला अतिरिक्त भुदंड पडत आहे. म्हणून वडत येथील शेतकरी विलास वराडे यांनी भिवापूर बाजार समितीचे सचिव गोंगल यांच्याकडे तक्रार केली आहे.
यावेळी मनोहर वानखेडे, मुकेश गायगवळी, मुन्ना माटे, स्वप्निल मालके उपस्थित होते.