चाळीसगाव प्रतिनिधी- रेल्वे विभागाच्या वतीने भुसावळ दौंड रेल्वे गाडी सहा महिने प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. मात्र ही गाडी आठवड्यातून एकदाच या मार्गावर धावते यामुळे या गाडीला पाहिजे तितका प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे रेल्वे विभागाने ही गाडी दौंड येथून कुर्डूवाडी सोलापूर पुढे सुरू करावी, तर खरजई कडे जाणाऱ्या राज्यमार्गावर रेल्वे गेट असून त्या ठिकाणी रेल्वेवर पुल बांधण्यात यावा. यासह कर्नाटक एक्सप्रेस ला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी मध्य रेल्वेचे जी एम ( जनरल मॅनेजर ) यांना रयत सेनेच्या वतीने दि. २८ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. भुसावळ ते दौंड गाडी अठवड्यांतुन गुरुवारी फक्त एक दिवस भुसावळ ते दौंड मार्गावर धावते यामुळे प्रवाशांचा पाहिजे तितका प्रतिसाद मिळत नसल्यामुळे रेल्वे गाडी कुर्डुवाडी,सोलापूर या दोन रेल्वे स्थानका पर्यंत रेल्वे गाडी सुरू केल्यास तुळजापूर,पंढरपूर,गांडगापुर,अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी हजारो वारकरी खांदेशातुन जात असतात त्यांना थेट गाडी उपलब्ध झाल्यास या गाडीला मोठा प्रतिसाद मिळून रेल्वे विभागाला देखील तिकीट विक्री होऊन मोठ्याप्रमाणात आर्थिक फायदा होणार आहे.म्हणून जनरल मॅनेजर यांनी रेल्वे बोर्ड व रेल्वे राज्यमंत्री यांच्या कडे पाठपुरावा करून रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते दौंड गाडी दौंड हुन कुर्डुवाडी ,सोलापूर कायमस्वरुपी करावी. तसेच चाळीसगाव खरजई राज्य मार्गावर रेल्वे लाईनवर रेल्वेचे गेट आहे.या ठिकाणाहून खरजई तरवाडे या गावांसह पाच ते सहा गावाना जाण्याच्या रस्ता आहे.अनेक रेल्वे गाड्या धावत असल्यामुळे अनेक वेळा गेट बंद केले जाते . यामुळे वाहनधारक व नागरिकांना तासनतास ताटकळत थांबावे लागत असल्यामुळे रेल्वे विभागाचे वतीने खरजई रेल्वे गेट येथे पुल बांधल्यास या परीसरातील नागरिकांना प्रवास करणे सोपे होणार आहे. यासह कर्नाटक एक्सप्रेस ला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी मध्य रेल्वेचे जी एम ( जनरल मॅनेजर ) यांना खरजई रेल्वे गेट येथे रयत सेनेच्या वतीने दि. २८ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, दिलीप पवार,अजय देशपांडे ,स्वप्नील देशपांडे, किरण पवार , प्रगतशील शेतकरी बाळासाहेब राऊत गोरख जाधव, गुलाब जाधव यांच्या सह्या आहेत.