माजी विद्यार्थी मयूर पाटील व आदर्श शिक्षक श्री गोकूळ पाटील व श्री दिनेश बोरसे यांच्या मदतीने….
बल्ली_वरची_शाळा
‘सुख समृध्दीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा’ बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक श्री अविनाश पाटील यांनी बल्ल्यावरील मुलांसाठी तेथे जाऊनच शिक्षण द्यायला सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाटील सरांनी यांना शिकवायला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी ते सतत नवीन नवीन प्रयोग करीत असतात.
आता दिवाळी च्या सुट्टीत सुद्धा त्यांनी श्री दिनेश बोरसे यांच्या सहकार्यातून व माजी विद्यार्थी मयूर पाटील व आदर्श शिक्षक श्री गोकूळ पाटील यांच्या मदतीने शैक्षणिक तक्ते भिंतीवर रंगवले ज्यामूळे या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होईल. त्यांच्या नजरेसमोर अंकगणित, इंग्रजी मूळाक्षरे व मराठी चे चार्ट राहतील. त्या विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांना सुद्धा शिक्षणाची आवड निर्माण होऊ लागली आहे. उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी फराळाचा आस्वाद घेतला. सगळ्यांनी मिळून याचा आनंद घेतला व दिवाळी साजरा केली. सोबत पर्यावरण पूरक सण उत्सव साजरे करण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली व सुट्टीत अभ्यास दिला.
या उपक्रमामुळे बल्ल्यावरील मुलांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. श्री अविनाश पाटील यांना या उपक्रमासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते संस्थेच्या सचिव मा. स्मिताताई विसपूते, प्राचार्य श्री पी. बी. पाटील व सर्व स्टाप यांच्याकडून प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले.