लाकडी ग्रामपंचायत भाजपकडे!
सरपंच कुशाबा भिसे व 7 सदस्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार!
– ग्रामपंचायतीचे 9 पैकी 7 सदस्य भाजपचे
– इंदापूरात भाग्यश्री बंगलो येथे सत्कार संपन्न
इंदापूर : प्रतिनिधी भगवान लोंढे दि.12/11/23
इंदापूर तालुक्यातील बहुचर्चित लाकडी ग्रामपंचायत भाजपकडेच असल्याचे रविवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले. या ग्रा.पं. चे सरपंच कुशाबा भिसे व ग्रा.पं. च्या 9 पैकी 7 भाजपच्या सदस्यांचा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथे भाग्यश्री बंगलो येथे रविवारी (दि.12) सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन करीत सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या. लाकडी ग्रामपंचायत माझा बालेकिल्ला असल्याचा इंदापूरच्या आमदारांनी गाजावाजा करून केलेला दावा फोल ठरला आहे.
लाकडी ग्रामपंचायतीचे 9 पैकी 7 सदस्य भाजपचे आहेत. नारायण मारुती वणवे, महादेव अगंद वणवे, नामदेव धोंडिबा वणवे, माऊली महादेव वणवे, अरुण पोपट वणवे, भास्कर काशिनाथ वणवे, प्रविण भाऊसो आगवणे या 7 सदस्यांचा हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सत्कार केला.
याप्रसंगी पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस दत्तूनाना वणवे, दूधगंगा दुध संघाचे माजी संचालक भास्कर वणवे, यावेळी ताराचंद वणवे, कोंडीबा वणवे, पांडुरंग वणवे, अंबादास वणवे, विष्णूतात्या वणवे, अनिल चव्हाण, सुनील चव्हाण, तात्यासाहेब आव्हाड, संजय वणवे,, गोरख वणवे, राम बळी, दत्तू चेअरमन, अनिल वणवे, पोपट वणवे, बापू केकान, राहुल खरात, आबा कोळेकर, रमेश वणवे, केशव वणवे, नाना ढोले व लाकडी ग्रामस्थ उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील यांच्या 3 ग्रा.पं.वरील भाजपच्या दाव्यावर शिक्कामोर्तब!
इंदापूर तालुक्यातील बावडा तसेच काझड व लाकडी या 3 ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे बहुमत असल्याचा दावा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक निकालानंतर केला होता. त्यानुसार इंदापूर येथे भाग्यश्री बंगलो येथे झालेल्या सत्कार समारंभास काझड ग्रामपंचायतीचे 11 पैकी भाजपचे 6 सदस्य तर लाकडी ग्रामपंचायतचे सरपंच व 9 पैकी 7 भाजप चे सदस्य उपस्थित होते. त्यानुसार भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी 3 ग्रामपंचायतींवर केलेल्या दाव्यावर रविवारी शिक्कामोर्तब झाले.