हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नीरा नरसिंहपुरच्या सरपंचपदी निवड झालेबद्दल अर्चना सरवदे यांचा सत्कार
इंदापूर :प्रतिनिधी भगवान लोंढे दि. 6/11/23
श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूरच्या सरपंच पदी निवड झालेबद्दल सरपंच अर्चना नितीन सरवदे यांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नीरा नरसिंहपूर येथे रविवारी (दि.5) सत्कार करण्यात आला.
श्री क्षेत्र निरा नरसिंहपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी दिली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नूतन सरपंच अर्चना सरवदे यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी नितीन सरवदे, विलास ताटे देशमुख, अण्णासाहेब काळे, नाथाजी मोहिते, संतोष मोरे, किशोर मोहिते, सचिन कदम, पप्पू गोसावी, धनाजी पवार, अभय वांकर आदी मान्यवर उपस्थित होते.