June 30, 2025 10:29 am

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग..

अपनी भाषा में पढ़े! Translate

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग..

अमळनेर: विक्की जाधव..

संमेलानाध्यक्ष, स्वागताध्यक्ष, प्रमुख संरक्षक व निमंत्रक यांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर आता विविध समित्यांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. यासंदर्भात २ नोव्हेंबर रोजी साहित्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची हितगुज सभा दुपारी १ वाजता सानेगुरुजी हायस्कुल, अमळनेर येथील एस. एम. गोरे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी दिली.

वाचक, साहित्यिक आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांच्या आनंदाचा वार्षिक सोहळा म्हणजे मराठी साहित्य संमेलन होय. यंदाचे ९७ वे मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेरमध्ये होत आहे. तब्बल ७१ वर्षांनंतर २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात रसिकांचा मेळा रंगणार आहे. हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी राज्यभरातील साहित्यिक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, साहित्य प्रेमी आदी मंडळी पुढे सरसावली आहे.

संमेलनाचे इतर पदाधिकारी आणि विविध समित्यांची निवड आठवडाभरात करण्यात येणार आहे. त्यांच्यावर जबाबदारी देखील सोपवण्यात येणार आहे. या संमेलनासाठी ज्यांना आपले सहकार्य व योगदान द्यावयाचे आहे, अश्या साहित्यप्रेमींनी आपले पूर्ण नांव, गांव, पत्ता दि. २ नोव्हेंबर २०२३ रोजी अध्यक्ष, मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर या नावाने लेखी कळवावे.

तसेच नियोजनासंदर्भात दि. २ रोजी होणाऱ्या हितगुज सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन म.वा महामंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह सोमनाथ ब्रह्मे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश महेश्वरी, प्रा.श्याम पवार, प्रा. शीला पाटील, अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, हेमंत बाळापूरे यांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!