शेटफळगडे येथे ग्रामपंचायत व सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांना गाव प्रवेश बंदी..
प्रतिनिधी:- प्रा तुषार वाबळे
मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम 24 ऑक्टोबरला संपला तरी देखील महाराष्ट्र सरकारने मराठा समाजास आरक्षण दिले नाही.
यामुळे शेटफळगडे/लामजेवाडी(ता. इंदापूर) येथील मराठा समाजाच्या वतीने गुरुवार 26 ऑक्टोबर पासून मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याच राजकीय पक्ष व नेत्यास शेटफळगडे/लामजेवाडी गावात प्रवेश मिळणार नसल्याचे येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सांगितले .
यावेळी ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांनी तसे पत्रक ही काढले.यात जो पर्यंत मराठा समाजाला ओ. बी.सी आरक्षण जाहीर होत नाही व सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत नाही तोपर्यंत कोणत्याच राजकीय पक्ष व नेत्यास शेटफळगडे /लामजेवाडी गावात प्रवेश मिळणार नसल्याचे नमूद केले आहे.