दौंड शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिन ढोल ताशांच्या गजरात उत्साहात साजरा…
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – दौंड शहरात तमाम भीम सैनिकांच्या वतीने ताशा पथकाच्या वाद्यावर धम्म रॅली काढत धम्म चक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर याची वेशभूषा साकारली होती.
शहरातून राजगृह बुद्ध विहार हुतात्मा चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे धम्म रॅली काढण्यात आली.अशोका विजयादशमीचा औचित्य साधत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयाया सोबत बौद्ध धम्माची दिक्षा घेत बौद्ध धम्म स्वीकारला म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो यावेळेस दौंड शहरांमध्ये ढोल ताशाच्या गजरात धम्म रॅली काढण्यात आली यावेळी राजगृह बुद्ध विहारातील उपासक उपासिका यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मानवंदना दिली व 22 प्रतिज्ञांचे वाचन करण्यात आले.
तसेच शहरातील आनंद बुद्ध विहार गजानन सोसायटी येथेही 67 वा धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमासाठी शहरातील समस्त बौद्ध बांधव व शहरातील अनेक दौंडकर बांधव उपस्थित होते.