July 1, 2025 1:42 pm

भिगवण येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीमधील फुटीनंतर पवार कुटुंब येणार एकाच मंचावर;कार्यक्रमात पुन्हा टीका- टिप्पणी होणार का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीमधील फुटीनंतर पवार कुटुंब येणार एकाच मंचावर;कार्यक्रमात पुन्हा टीका- टिप्पणी होणार का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष

(निलेश गायकवाड )

अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मोठी फूट पडली. या पक्षफुटीमुळेच राष्ट्रवादीमध्ये सध्या अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पाहायला मिळत आहेत. दोन्ही गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा केला जात असल्याने मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादीमधील दोन गटात संघर्ष सुरू असतानाच पवार कुटुंबीय म्हणजेच शरद पवार अन् अजित पवार एका मंचावर येणार आहेत.

राष्ट्रवादीमधील फुटीनंतर दोन्ही गटांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर पवार कुटुंबीयही एका मंचावर आले नव्हते. मात्र आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार आहेत.

दौंडमध्ये २२ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात पवार कुटुंबीय एकत्र येणार आहेत.भिगवण नजीक दौंड तालुक्यातील चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नवीन वास्तूच्या उदघाटन प्रसंगी पवार कुटुंबीय एकत्र येणार आहेत.

स्वामी चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम विद्या प्रतिष्ठान स्कूलच्या नवीन वास्तूच्या उदघाटनाचा कार्यक्रम आहे. आज २२ ऑक्टोंबर रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. या नव्या वास्तूचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थितीत राहणार आहेत.

त्यामुळे या कार्यक्रमात पुन्हा टीका- टिप्पणी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!