बॅंकेवर दरोडा घालण्याकरीता निघालेली आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद गॅस कटरच्या सहाय्याने बॅंक, ज्वेलर्स शॉप, फोडणारे सराईत 13 आरोपी अटक एकूण 6,42,770 रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत..
स्थानिक गुन्हे शाखेची ‘धडाकेबाज’ कामगिरी..
सोलापूर ग्रामीण जिल्हयातील माळशिरस पोलीस ठाणे गुरनं ३८८ / २०२३ भादविसंक ३८०, ४५४, ४५७, ३४ प्रमाणे दिनांक १८/०७/२०२३ रोजी गुन्हा दाखल आहे. नमूद गुन्हयातील आरोपीतांनी माळशिरस येथील जिल्हा मध्यवर्ती बँक, सदाशिवनगर, माळशिरस याबँकेची भिंत फोडून गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे लॉकर तोडून ५१,१६,४४७ रु. किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.
सदर गुन्हयाची मा. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी गंभीर दखल घेवून घटनास्थळास भेट देवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या. सदर सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथके तयार करून त्यांनी गुन्हयातील आरोपीतांची माहिती प्राप्त केली. गॅस कटरच्या सहाय्याने भिंत फोडून बँकेत चोरी करण्याची पध्दत झारखंड येथील आरोपी ठिकठिकाणी वापरतात असे तपासात लक्षात आले होते. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा देखील झारखंड येथील आरोपीतांनी केला असल्याचे समजले.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि धनंजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने झारखंड राज्यातील साहेबगंज व पश्चिम बंगाल राज्यातील मालदा जिल्हयातून ०२ आरोपींना ताब्यात घेतले होते. उर्वरित आरोपी हे नेपाळ, बांगलादेश मध्ये पळून गेल्यामुळे मिळून येत नव्हते.
दिनांक १०/१० / २०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि धनंजय पोरे यांना गोपनीय बातमी मिळाली की, झारखंड व नेपाळ येथील आरोपी हे लातूर येथील बँकेवर दरोडा टाकण्याकरीता येणार आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शशिकांत शेळके व पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सुबोध जमदाडे यांनी सोलापूर तुळजापूर महामार्गावरील मौजे उळे गांवच्या हद्दीत सापळा रचून अत्यंत शिताफीने दरोडयाच्या तयारीत असलेल्या ०५ आरोपींना दरोडयाच्या साहित्य व वाहनासह ताब्यात घेतले. सदरबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरनं ६१७ / २०२३ भादविसंक ३९९ प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात इतर ०८ आरोपींचा सहभाग असलेबाबत निष्पन्न झाले.
नमूद गुन्हयाचे तपासात सपोनि शशिकांत शेळके यांनी ०३ आरोपींना पुणे येथून ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांनी उदगीर लातुर येथून ०५ आरोपीतांना ताब्यात घेतले आहे. सदर गुन्हयात एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी हे झारखंड राज्यातील साहेबगंज जिल्हयातील, पश्चिम बंगाल राज्यातील मालदा जिल्हयातील तसेच नेपाळ या देशातील आहेत. यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी देशाच्या विविध भागात गॅस कटरच्या सहाय्याने बँक फोडीसारखे गंभीर गुन्हे केले आहेत.
यातील अटक आरोपीतांकडे केलेले कौशल्यपूर्ण तपासात ०४ आरोपीतांचा माळशिरस पोलीस ठाणे गुरनं ३८८ / २०२३ भादविसंक ३८०, ४५४, ४५७, ३४ प्रमाणे दाखल गुन्हयात सहभाग निष्पन्न झाला असून त्यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे. तसेच यातील आरोपी हे वाकड, पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड, पोलीस आयुक्तालय गुरनं ६५१/२०२३ भादविसंक ३९५, ३९८,३०७ इत्यादी सह आर्म अॅक्ट ४, २५ व तेलंगना राज्यातील सुजातानगर पोलीस ठाणे गुरनं ८३ / २०२३ भादविसंक ४५७, ३८० प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी आहेत.
नमूद गुन्हयातील आरोपी क्र. १ ते १३ यांना अटक करून मा. न्यायालयासमोर हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यांना दिनांक १६/१०/२०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नमूद गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शशिकांत शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण हे करीत आहेत. आरोपीतांचे ताब्यातून दरोडा टाकण्यासाठी व बँक फोडण्यासाठी लागणारे मोठे गॅस सिलेंडर, गॅस कटर, मोठे स्कु ड्रायव्हर, कटावण्या, लोखंडी काणस, हातोडे, लोखंडी पहार, दोरी, कोयते इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपींनी संपर्ण महाराष्ट्रात तसेच देशातील विविध भागात गुन्हे केल्याची शक्यता असून त्याबाबत माहिती घेण्यात येत आहे.
सदरची कामगिरी श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, श्री. हिंमत जाधव अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली सपोनि धनंजय पोरे, शशिकांत शेळके, पोलीस उपनिरीक्षक / शैलेश खेडकर, सुबोध जमदाडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सफौ / ख्वाजा मुजावर, शिवाजी घोळवे, मनोहर माने, श्रीकांत गायकवाड, नारायण गोलेकर, पोलीस हवालदार/ बापू शिंदे, आबा मुंडे, धनाजी गाडे, प्रकाश कारटकर, सलिम बागवान, मोहन मनसावाले, विजय भरले, रवि माने, पोना / धनराज गायकवाड, चालक समीर शेख, पोशि/ अजय वाघमारे, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, दिलीप थोरात, युसुफ पठाण, अन्वर अत्तार, समर्थ गाजरे, सुरज रामगुडे, विनायक घोरपडे यांनी बजावली आहे.