निपुण भारत अभियानात राज्यात माता पालक गटांना भेटून केला जाणार निपुण महाराष्ट्र उत्सव
शालेय शिक्षणाच्या सबलीकरणासाठी केंद्र शासनाद्वारा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० निपुण भारत अभियाना अंतर्गत प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यावर सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानुसार वय वर्ष ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत २९ जून २०२२ शासन निर्णयानुसार राज्यभर निपुण महाराष्ट्र कार्यक्रम राबविला जात आहे. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमा अंतर्गत समग्र शिक्षा अभियान, महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, म.रा.पुणे आणि प्रथम संस्थेच्या मदतीने या अभियानाची प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळा, गाव व वस्ती स्तरावर इयत्ता पहिली ते तिसरी च्या सर्व विद्यार्थ्यांच्या मातांचे गट बांधणी करून महाराष्ट्रात २ लाख ६२ हजार मातांचे गट तयार केले गेले आहेत. यामध्ये जवळपास १० लाख माता सहभागी झालेल्या आहेत. Whats app समूहाच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्यात माता पालक गटांना शिक्षकांमार्फत मार्गदर्शन केले जात आहे. लीडर मातांद्वारे गटातील इतर माता त्यांच्या सवडीनुसार आठवड्याला एकदा भेटत आहेत. माता गटांना राज्यस्तरावरून प्रथम संस्थाच्या मदतीने आयडिया व्हिडीओ activity समजून घेत आहेत. माता घरी जाऊन आपल्या मुलांसोबत त्या कृती करत आहेत. यासर्व बाबीचा एक चांगला सकारात्मक परिणाम सर्व स्तरावर दिसून येत आहे. याबाबत राज्यस्तरापासून ते शाळा पातळीवरील सर्व यंत्रणेची सहकार्य लाभत आहे. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमात निपुण बालके होण्यासाठी सर्व माता गटांनी शैक्षणिक चळवळ हाती घेतली आहे. अश्या सर्व माता पालक गटांना भेट देण्यासाठी निपुण महाराष्ट्र उत्सव राज्यात दिनांक ९ ऑक्टोबर २०२३ ते २१ ऑक्टोबर २०२३ यादरम्यान सर्व शासकीय यंत्रणा, समाजसेवी संस्था, प्रथम संस्था प्रतिनिधी आणि इतर सर्व मंडळी माता गटांना भेट देऊन माता गटांना शैक्षणिक चळवळी सहभागाबद्दल प्रोत्साहन देणार आहेत.
असा असेल निपुण महाराष्ट्र उत्सव…..
निपुण महाराष्ट्र उत्सव राज्यात एकाच वेळी सर्व शासकीय यंत्रणा, समाजसेवी संस्था, प्रथम संस्था प्रतिनिधी आणि इतर सर्व मंडळी प्रत्येकी तीन गावात माता गटांना भेट देऊन माता गटांना शैक्षणिक चळवळी सहभागाबद्दल शुभेच्छा व कौतुक केले जाईल. माता पालक गटांला भेटी देत असतांना लिडर माता व माता पालक गटांच्या सदस्यासोबत साप्ताहिक मिटिंग, शालेय मासिक मातांची गटांची कार्यशाळा, आयडीया व्हीडीओ इत्यादी विषयावर चर्चा केली जाईल सदर भेटीदरम्यान घेतलेली निरीक्षणे राज्यस्तरावरुन उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकमध्ये याची नोंद केली जाईल. भेट देणारे सर्व अधिकारीवर्ग प्रथम संस्था माता पालक गटाच्या भेटीच्या संकलीत अहवालावर राज्य/ विभाग/ जिल्हा/तालुका/ स्तरावर चर्चा केली जाईल सोबत दिलेली प्रश्नावली भेटीदरम्यान माता गटांसोबत सोबत प्रभावी चर्चा घडवून आणण्यासाठी उपयोगी ठरेल.
प्रत्येक गावात वाडी – वस्ती येथे माता पालक गट भेट घेणे या वर्षामधील इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांचे माता या गटामध्ये सहभागी आहे का हे पाहणे. प्रत्येक माता पालक गटाला प्रत्येक आठवड्यास आयडीया व्हीडीओ मिळतात का? त्यावर गावातील सर्व माता पालक गट आठवड्यातून किमान एकदा भेटून आयडीया व्हीडीओ मध्ये सांगीतल्या प्रमाणे काम करतात का? आपल्या मुलांने निपुण व्हावे याबाबत मातांना नेमके काय वाटते आहे? माता पालक गटासोबत भेटी देणान्या अधिकारी यांनी आयडीया व्हीडीओ मधील काही टास्क करुन दाखविले जाईल. शिक्षक व इतर मंडळी या माता – पालक गटांना कसे सहकार्य करीत आहे याबाबत चर्चा केली जाईल.तसेच त्याच्या गटात काय काय गमती -जमती होत आहेत. प्रत्येक माता पालक गटात निपुणची उदिष्ट बाबत जागरूकता केली जाईल.
निपुण महाराष्ट्र कार्यक्रमात राज्यस्तरावर आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे, राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा (महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद) मुंबई. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद(SCERT), महाराष्ट्र राज्य, पुणे. विभाग स्तरावर विभागीय आयुक्त, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका स्तरावर आयुक्त, महानगरपालिका, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी/ शिक्षण प्रमुख, महानगरपालिका आणि तालुका स्तरीय नियोजनात सर्व शिक्षण विभातील यंत्रणा व अंमलबजावणीत प्रथमचे सहकार्य प्राप्त होत आहे.
चला तर मग माता गटांना भेटूया निपुण महाराष्ट्र घडवूया !
मुलांच्या शिक्षणात माता पालकांची भूमिका महत्वपूर्ण आहे, मुलांचा भाषिक, गणितीय, सामाजिक भावनिक विकास होण्यासाठी माता मुलांना शिकण्यास मदत करू शकते. हा आत्मविश्वास मातांना निपुण महाराष्ट्र कार्यक्रमा मुळे निर्माण होतोय.
शैक्षणिक दृष्ट्या ही निपुण महाराष्ट्र घडविण्यात हातभार लावणारी चळवळ असून सर्वांनी आपला सहभाग नोंदवून सहकार्य करावे.
श्री गणेश पाटील
विभागीय समन्वयक- प्रथम संस्था (निपुण महाराष्ट्र कार्यक्रम)
विभाग – नाशिक