शैक्षणिक क्षेत्रातील राजा असलेल्या प्राध्यापक डॉक्टर अरुण मारुती कांबळे सर यांचा सेवा पूर्तीचा कार्यक्रम विश्वासराव रणसिंग महाविद्यालय येथे इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत पार पडला.
निरा नरसिंहपुर: दिनांक- 3, प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
अफाट बुद्धिमत्ता, शांत व संयमी स्वभाव आणि शैक्षणिक जीवनामध्ये सदैव डिस्टिंक्शनमध्ये व पहिल्या नंबर वरती राहणारे प्राध्यापक कांबळे सर यांनी डॉक्टरेट ची पदवी संपादन केलेली आहे. विश्वासराव रणसिंग महाविद्यालय येथे ते उपप्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख या पदावर कार्यरत होते. 31 ऑगस्ट रोजी त्यांच्या सेवेची 35 वर्षे पूर्ण होऊन ते सेवानिवृत्त झाले. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे रणसिंग महाविद्यालय यांच्या वतीने 2 सप्टेंबर 2023 रोजी सेवापुर्तीचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार दत्तामामा भरणे , सोनू भैय्या जाधव, श्रीमती आनंदी (काकी) विश्वासराव रणसिंग, प्रकाश कदम, वीरसिंह भैया रणसिंग, हनुमंतराव रणसिंग, शिवाजीराव रणसिंग, कुलदीप हेगडे, सौ. वीरबाला पाटील, प्राचार्य डॉ. अंकुश आहेर सर, वैभव गीते,सागर बाबा मिसाळ, सौ.लता अरुण कांबळे, कुमारी प्रज्ञा अरुण कांबळे, कुमारी डॉ.कल्याणी अरुण कांबळे, प्रतीक अरुण कांबळे तसेच वडील मारुती कांबळे, सासरे मधुकर भोसले, माजी प्राचार्य चंद्रकांत कांबळे, वहिनी बेबी कांबळे,आजी-माजी शिक्षक, कर्मचारी, आजी-माजी प्राचार्य, आजी-माजी विद्यार्थी तसेच आप्तेष्ट व नातलग यांच्या उपस्थितीमध्ये सरांच्या बरेच सहकाऱ्यांनी,आजी-माजी विद्यार्थ्यांनी व नातेवाईकांनी सरांविषयीच्या जुन्या गोष्टी सांगितल्या व त्यांचे कौतुकाचे सोहळे गायले व सांगितले .डॉक्टर अरुण कांबळे सरांच्या बुद्धी विषयी व गुणांविषयी लिहिले तर पुस्तकही कमी पडेल. अशा सर्व गुणसंपन्न, हुशार, शिस्तप्रिय, संयमी, प्रेमळ व अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या गुणवंत शिक्षकाचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम म्हणजे एक अलौकिक व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा संपन्न झाला. तसेच शेवटी स्नेहभोजन करून सर्वांनी या सोहळ्याचा साक्षीदार म्हणून नोंद केली.