समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे
कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयइंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ” शिष्यवृत्तीच्या योजना व जात वैधता प्रमाणपत्र या विषयावर व्याख्यान
प्रतिनिधी- भगवान लोंढे
समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्यवृत्तीच्या योजना व जात प्रमाणपत्र प्रक्रिया या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जीवन सरवदे विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर ,कला शाखा प्रमुख डॉ. भिमाजी भोर तसेच समान संधी केंद्राचे प्रमुख डॉ.गजानन ढोबळे हे उपस्थित होते .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण अधिकारी श्री संतोष जाधव समाज कल्याण विभाग पुणे तसेच श्री हेळकर सर हे उपस्थित होते .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री संतोष जाधव यांनी जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया व महत्त्व विद्यार्थ्यांना सविस्तरपणे समजून सांगितले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेऊन वेळेत पाठपुरावा केल्यास विद्यार्थ्यांना मदतच होते. असे ते म्हणाले .विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी लागणारी कागदपत्रे त्यांची पूर्तता वेळेत केल्यास योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करणे प्रशासन व शासनाला शक्य होत असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन स्व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले.
तसेच या कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री हेळकर सर सर यांनीही शासनाची वस्तीगृह योजना व तिचे स्वरूप याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . जीवन सरवदे सर यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ . तानाजी कसबे यांनी केले तर आभार प्रदर्शनाचे काम डॉ . भिमाजी भोर यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.