June 30, 2025 2:36 pm

लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे जिल्हास्तरीय आदर्श क्रिडा मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित..!

अपनी भाषा में पढ़े! Translate

लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे जिल्हास्तरीय आदर्श क्रिडा मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित..!

अमळनेर : विक्की जाधव.

लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे यांना जळगाव जिल्हा क्रीडा महासंघातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सरांनी विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये मार्गदर्शन केले व जिल्हास्तरावर क्रिकेट, बुद्धिबळ अशा विविध खेळांमध्येविद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले त्यांच्या कार्याची पावती म्हणून जिल्हास्तरीय मुख्याध्यापक आदर्श क्रीडा पुरस्कार देण्यात आला.

जळगाव येथे नुकताच कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक मनोहर महाजन व प्रविण पाटील उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी आणि व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!