राज्यातील काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत.
दरम्यान , उद्या २७ ऑगस्टपर्यंत दक्षिण कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे . दरम्यान , उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश , उत्तराखंड , पंजाब या राज्यात पावसाने गेल्या काही दिवसांपासून कहर केला आहे . तर देशातील उर्वरित राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे.
दरम्यान , पुढचे दोन दिवस हवामान विभागाकडून बहुतांश ईशान्यकडील राज्यांना भारतात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे . आज दुपारी हवामान विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या बुलेटीननुसार , शनिवार ( दि . २६ ) आणि रविवारी ( दि . २७ ) ईशान्य भारतातील राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता ( Rainfall Forecast ) आहे .
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार , 26 ते 27 ऑगस्ट दरम्यान ईशान्य भारतातील आसाम , मेघालय , सिक्कीम आणि अरूणाचल प्रदेशातील विविध भागात अति मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे . तसेच गंगेचे खोरे , पश्चिम बंगाल , झारखंड , ओडिशा आणि बिहार या राज्यातही पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे . त्यानंतर येथील पाऊस कमी ( Rainfall Forecast ) होईल.
हिमाचल प्रदेश , उत्तराखंड , पूर्व उत्तर प्रदेशातही आणखी पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील एक आठवडाभर देशाच्या उर्वरित भागांमध्येही कमी प्रमाणात पावसाची शक्यता आहे , असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे .