नीरा नरसिंहपुर गावांमध्ये प्रथमता वकील झालेल्या मुलींचा सत्कार समारंभ ग्रामपंचायत नीरा नरसिंहपूर तर्फे करण्यात आला.
निरा नरसिंहपुर: दिनांक- 23, प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
नीरा नरसिंहपुर येथील प्रथमताच वकील झालेल्या मुलींचा सत्कार ग्रामपंचायतीने केला. कुमारी ऋतुजा अनंत काकडे या मुलीने L.L.B ही पदवी वसंतराव पवार लॉ कॉलेज बारामती येथून संपादन केली तसेच कुमारी संघमित्रा मच्छिंद्र सरवदे या मुलीने BA.MBA. आणि LLB ही पदवी हुतात्मा राजगुरू विधी महाविद्यालय राजगुरुनगर पुणे येथून संपादन केली. ऋतुजा काकडे यांचा सत्कार नरसिंहपुर गावच्या विद्यमान सरपंच सौ .अश्विनी चंद्रकांत सरवदे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच कुमारी संघमित्रा मच्छिंद्र सरवदे यांचा सत्कार निरा नरसिंहपुर गावच्या उपसरपंच सौ. रेणुका आनंद काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निरा नरसिंहपुर गावच्या विद्यमान सदस्य तसेच भावी सरपंच सौ. अर्चना सरवदे याही उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी निरा नरसिंहपुर गावातील चंद्रकांत सरवदे ,आनंद काकडे , माजी सरपंच नरहरी काळे, माजी सरपंच जगदीश सुतार, शिवाजी गोडसे, प्रभाकर जगताप, अतुल घोगरे, राजेंद्र बळवंतराव, मेननाथ सरवदे, तंटामुक्त अध्यक्ष दशरथ दादा राऊत, माजी सरपंच संतोष आप्पा मोरे , अनंत पाटील सर, नंदकुमार पाटील सर, ग्रामसेवक म्हेत्रे भाऊसाहेब तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.