खान्देशची मुलुख मैदान तोफ पडद्याआड.
अमळनेर : विक्की जाधव..
अमळनेर तालुक्याचे माजी आमदार साथी गुलाबराव वामनराव पाटील रा. दहिवद यांचे आज सायंकाळी दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दिनांक 23 रोजी 2.00 वाजता दहिवद येथील घरून निघणार आहे तसेच सकाळी साने गुरुजी विद्यालय अमळनेर येथील पटांगणात 7 ते 8 वाजेपर्यंत मुखदर्शनासाठी थांबणार आहोत तरी शोकाकुल बंधू आणि बघिनींनी मुखदर्शनास यावे तदनंतर 8 वाजता दहिवद येथे रवाना होणार आहे पाटील हे एस टी महामंडळ कामगार संघटनेचे 16वर्षे जळगाव विभागाचे अध्यक्ष होते. तर त्यांनी विविध पद भूषविलेले होते. अंमळनेर तालुक्याचे माजी आमदार साथी बापुसो गुलाबराव वामनराव पाटील यांचे दुःखत निधन झालेने. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.