June 30, 2025 11:21 pm

तलाठी परिक्षा केंद्रावरील कडक नियमांमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकले

अपनी भाषा में पढ़े! Translate

तलाठी परिक्षा केंद्रावरील कडक नियमांमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकले

नागपूर जिल्हा प्रतिनिधी – नंददत डेकाटे

१) जिंदाल ऐज्युकेट प्रायव्हेट लिमिटेड,गोंडखैरि येथील तलाठी परिक्षा केंद्रावर सोयीचा अभाव
२) कडक नियमांमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकले आहेत
३) वेळेच्या आत परिक्षा केंद्रावर येवून सुध्दा परीक्षार्थींना उशीरा प्रवेश
४) मुलांना मोबाइल,घडी इत्यादी साहित्य जवळ बाळगण्यास सक्त मनाई
५) काट्याच्या घडीला परवानगी असूनही परिक्षार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही,परिक्षार्थ्यांची तक्रार

केंद्र व राज्य शासनाने अनेक क्षेत्रातील पदभरत्याचा सपाटा लावला आहे,केंद्र आणि राज्यात विविध स्तरांवर अनेक ठिकाणी त्यात शहरी व ग्रामीण भागातील शैक्षणीक संस्थेत, हब मध्ये, अथवा गोदामाच्या ठिकाणी सुध्दा ह्या परिक्षा घेतल्या जात आहेत.
अशीच तलाठ्याची परिक्षा नागपूर जिल्ह्यातील अमरावती ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील गोंडखैरी गावा जवळील जिंदाल ऐज्युकेट प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी घेण्यात आली.दोन ते तीन सत्रात ह्या परिक्षा घेतल्या जात आहेत
अशातच सोमवार दिनांक २१/८/२०२३ ला दुपारी १२:३० वाजता तलाठ्याचा पेपर होता केंद्रावर वेळेवर उपस्थित राहुन सुध्दा परिक्षार्थ्यांना उशिरा प्रवेश दिला,त्यात विद्यार्थ्यांना कोणती हातगाडी वापरावी व कोणती वापरू नये असी सुचना दिली परंतु परिक्षार्थ्यानी नियम पाळून सुध्दा परिक्षा केंद्रावर घेतले नाहीत.
महिला परिक्षार्थ्यांना आपली दाग- दागिने (आभुषणे) मंगळसुत्रे घालून येवू नये तसेच महिलांना पर्स वा मोबाईल फोन सुद्धा जवळ ठेवण्यास मनाई केली. ह्या परिक्षा केंद्रावर सुविधांचा अभाव ह्या केंद्रावर मुतारी, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय सुध्दा नाही अशी तक्रार परिक्षार्थ्यानी केली आहे.
तलाठ्याच्या परिक्षा अर्जासाठी ९००/- (नवशे रुपये) भरून दूरून दुरून आलेल्या परिक्षार्थ्यांची परिक्षा केंद्रावर गैरसोय होत आहे असं परिक्षार्थ्यानी सांगितले

१)परिक्षार्थी सारंग नरेश वावरे मु.नागपूर :- मी ११:०० वाजता परिक्षा केंद्रावर पोहोचलो १२:३० चार पेपर होता परंतु परिक्षार्थ्यांना १:०० वाजता प्रवेश दिला व मला माझ्या हाताला असलेल्या घडीमुळे घेतले नाही,माझी घडी ही इलेक्ट्रॉनिक व डिजिटल नाही ती हाताने बनवलेले काट्याचे घड्याळ आहे असे सांगूनही मला केंद्रावर घेतले नाही.

२) उषा गोधाने राहणार अमरावती:- अमरावती शहरात पाच परिक्षा केंद्र आहेत काही महिला, पुरुषांना तिथे परिक्षा केंद्र मिळाले आणि काहींना ह्या ठिकाणी केंद्र मिळाले आहे. आम्ही परिक्षेसाठी नवशे रूपये भरले, येथे येण्यासाठी लागलेला पैसा,आजची गेलेली मजूरी त्यात ह्या केंद्रावरील जाचक नियमावली ह्यामुळे फार त्रस्त झाले मला माझ्या शरीरावरचे दाग दागिने त्यात मंगलसुत्र सुद्धा काढायला लावले तसेच बॅग सुध्दा जवळ ठेवण्यास मनाई केली ह्यामुळे मला फार त्रास झाला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!