धार- मारवड रस्त्यावरील टेकडीचे शिव टेकडी ट्रेकिंग स्पॉट म्हणून पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या हस्ते नामकरण
अमळनेर : शहराच्या उत्तरेस धार रस्त्यावरील टेकडीला शिव टेकडी ट्रेकिंग स्पॉट नामकरण पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकसहभागातून टेकडीचा विकास करा , नागरिकांना निसर्गरम्य वातावरणात ट्रेकींगचे आवाहन करा. मात्र याठिकाणी व्यसनाधीन लोकांना आणि गैरप्रकार करणाऱ्या लोकांना येऊ देऊ नका अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देऊन ट्रेकिंग करणाऱयांनीच काळजी घेऊन पोलिसांना काळविण्याचे आवाहन ही पोलीस निरीक्षक शिंदे यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ अनिल शिंदे , डॉ संदीप जोशी ,दिगंबर महाले , कुणाल पाटील ,माजी नगरसेवक प्रताप शिंपी हजर होते. शहराबाहेर असलेल्या टेकडी ओसाड पडलेली होती. प्रताप शिंपी , जीवन पवार आणि त्यांच्या मित्रपरिवाराने ही टेकडी विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. टेकडीचे नामकरण प्रसंगी हितेश चिंचोरे ,श्रीकांत शिंपी , सुनील पाटील , अमोल चौधरी , बंटी चौधरी ,जितू ठाकूर , मनोज जोशी , रवींद्र पाटील , सुनील पाटील , विजय पाटील ,संजय पाटील , सुरज शिंपी , संदीप पाटील , हिरामण पाटील , जिजाबराव पाटील , जगदीश पाटील , राजेंद्र पाटील ,नाना चौधरी , भरत ठेकेदार ,आप्पा पगारे , गोटू मराठे , किशोर पाटील ,राजू राजस्थानी ,माळी हजर होते.