भावना गायकवाड (धुमाळ) यांच्यावर झालेल्या अन्याय व अत्याचार विरोधात दौंड येथील समस्त भीम अनुयायी आक्रमक.
21 ऑगस्ट रोजी निघणार भिमजन आक्रोश मोर्चा.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – दौंड येथील प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. धुमाळ व यांचे कुटुंबीय यांचे विरोधात स्वतःच्या पत्नी व मुलीला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला परंतु आजतागायत अटक करण्यात आली नसून ते अद्यापही मोकळे फिरत आहेत. भावना गायकवाड धुमाळ या मागासवर्गीय असल्या कारणाने यांची तक्रार घेण्यासाठी आधीच 11 तास विलंब लावल्याने कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी सबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी व डॉ धुमाळ तसेच प्रियेसी व नातेवाईक यांचेवर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व डॉ सदानंद धुमाळ यांनी तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी दौंड येथील समस्त भीम अनुयायी यांचे वतीने भिमजन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले जाते
आक्रोश मोर्चा रुट राजगृह बुध्द विहार – डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक – संविधान चौक येथुन दौंड पोलीस स्टेशन या मार्गे निघेल दरम्यान होणाऱ्या कायदा सुव्यवस्था प्रश्नी शासन जबाबदार असेल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदन देते वेळी व निवेदनावर सह्या असणारे भीम अनुयायी
रविंद्र कांबळे, सतिश थोरात,अमित सोनवणे,नागेश साळवे,नरेश डाळिंबे,नागसेन धेंडे,भारत सरोदे,राजू जाधव,सागर उबाळे,संजीव आढाव,आश्विन वाघमारे,सचिन खरात,आशा मोहिते,अमित बगाडे,अनिल साळवे,यादेव जाधव,राजेश मंथने व आरिफ शेख हे उपस्थित होते.